जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Lockers New Rule: नुकसान झाल्यास ग्राहकांना मिळणार मोठी भरपाई, RBI ने जारी केले नियम

Bank Lockers New Rule: नुकसान झाल्यास ग्राहकांना मिळणार मोठी भरपाई, RBI ने जारी केले नियम

लॉकरमध्ये सामान ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं काही नियम तयार केले आहेत. यामध्ये टर्म डिपॉझिटचा समावेश आहे.

लॉकरमध्ये सामान ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं काही नियम तयार केले आहेत. यामध्ये टर्म डिपॉझिटचा समावेश आहे.

जर तुम्ही बँकांच्या लॉकरमध्ये पैसे, दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे (documents) ठेवत असाल तर हे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 25 फेब्रुवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँक लॉकर्सशी संबंधित नवीन नियम (Bank Lockers New Rule) लागू केले आहेत. जर तुम्ही बँकांच्या लॉकरमध्ये पैसे, दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे (documents) ठेवत असाल तर हे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आलेल्या या नियमांतर्गत, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना जाळपोळ, चोरी, इमारत कोसळणं किंवा बँक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झाल्यास नुकसानीची मर्यादा निश्चित केली आहे. यापुढे लॉकरसंबधित काही गैर घडल्यास ग्राहकाला बँक लॉकरच्या सुविधेसाठी भरलेल्या वार्षिक रकमेच्या 100 पट भरपाई दिली जाईल. म्हणजेच जर बँक तुमच्याकडून वार्षिक 5,000 रुपये लॉकर फी आकारत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरबीआयने बँक लॉकर्सबाबत बँकांची जबाबदारी निश्चित केली आहे. नवीन नियम सुरक्षित लॉकर आणि बँकांमधील सुरक्षित कस्टडी या दोन्हींवर लागू होतील. फेब्रुवारी 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) आरबीआयला 6 महिन्यांच्या आत लॉकर व्यवस्थापनाबाबत सर्व बँकांसाठी एकसमान नियम लागू करण्याचे निर्देश दिले होते. हे वाचा- शेअर बाजार तेजीसह बंद, Sensex 1329 अंकांनी तर Nifty 410 अंकांनी वधारला पुढील वर्षापासून बँक करणार नवीन करार बँकांनीही त्यांच्या लॉकरबाबत नवीन नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँका लॉकर धारकांसोबत नवीन करार (agreement) सुरू करतील. बँका इंडियन बँक्स असोसिएशनद्वारे (IBA) ड्राफ्ट लॉकर कराराची अंमलबजावणी करतील. सर्व सरकारी आणि खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना लॉकर सुविधा देतात आणि त्यासाठी त्या वार्षिक शुल्कदेखील आकारतात. ग्राहकांनी मौल्यवान वस्तूंची यादी तयार करावी ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या त्यांच्या मौल्यवान वस्तूंची यादी तयार करावी. जर तुम्ही त्यातून कोणती वस्तू काढली किंवा नवीन वस्तू ठेवल्या तर, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असायला हवी. तुम्हाला तुमच्या वस्तूंबद्दल माहिती नसल्यास, तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत नुकसानीचा दावा करू शकणार नाही. जर तुम्ही यादी करून ठेवली तर कोणतीही वस्तू गहाळ झाली असल्यास तुम्ही ती सहज शोधू शकाल. हे वाचा- Mutual Fund: डिमॅट की स्टेटमेंट ऑफ अकाऊंट? होल्डिंगसाठी कोणता पर्याय उत्तम? …तर बँक लॉकर तोडणार लॉकर मालकांनी त्यांचे लॉकर्स वर्षातून किमान एकदा उघडणं आवश्यक आहे. लॉकर अनेक वर्षांपासून बंद असल्यास, बँक नियम प्रक्रियेचे पालन करून तुमचे लॉकर तोडू शकते. मात्र, तसे करण्यापूर्वी बँकेला ग्राहकाला नोटीस पाठवावी लागेल. तसेच, लॉकर अनेक वर्षांपासून बंद असेल, तर त्याची माहितीही तुम्हाला बँकेला द्यावी लागेल. तुम्हीही बँकेचे लॉकर वापरत असाल तर नवीन नियमांचं पालन करणं आवश्यक असेल. तसेच लॉकरमध्ये ठेवलेल्या तुमच्या दागिन्यांची आणि वस्तूंची यादी करायला विसरू नका.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात