जाहिरात
मराठी बातम्या / मनी / share Market Update: शेअर बाजार तेजीसह बंद, Sensex 1329 अंकांनी तर Nifty 410 अंकांनी वधारला

share Market Update: शेअर बाजार तेजीसह बंद, Sensex 1329 अंकांनी तर Nifty 410 अंकांनी वधारला

share Market Update: शेअर बाजार तेजीसह बंद, Sensex 1329 अंकांनी तर Nifty 410 अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर हिरव्या रंगात आणि केवळ एक शेअर लाल चिन्हात बंद झाले, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 47 शेअर हिरव्या चिन्हात बंद झाले आणि केवळ 3 शेअर लाल चिन्हात बंद झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Share Market) गुरुवारच्या घसरणीच्या धक्क्याने बाजार एकाच दिवसात बाहेर आला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार मोठ्या तेजीत बंद झाला. सात दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात बाउन्सबॅक दिसून आला आहे. सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1,328.61 अंकांच्या किंवा 2.44 टक्क्यांच्या वाढीसह 55,858.52 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 410.40 अंकांच्या किंवा 2.53 टक्क्यांच्या उसळीसह 16,658.40 वर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर हिरव्या रंगात आणि केवळ एक शेअर लाल चिन्हात बंद झाले, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 47 शेअर हिरव्या चिन्हात बंद झाले आणि केवळ 3 शेअर लाल चिन्हात बंद झाले. सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाला. निफ्टी मेटल इंडेक्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त, पीएसयू बँक इंडेक्स 4.6 टक्क्यांनी आणि फार्मा आणि बँक इंडेक्स प्रत्येकी 3 टक्क्यांनी वाढले. Hot Stocks: ‘या’ स्टॉक्सना BUY रेटिंग, 2-3 आठवड्यात 26 टक्क्यांपर्यंत परतावा शुक्रवारच्या व्यवहारात Britannia Industries, Nestle India आणि HUL हे निफ्टीचे टॉप लूजर ठरले. दुसरीकडे Coal India, Tata Motors, Tata Steel, Adani Ports आणि IndusInd Bank निफ्टीमध्ये टॉप गेरन ठरले. Cryptocurrency Update : क्रिप्टोकरन्सीमध्ये कालच्या पडझडीनंतर तेजी, वाचा सध्याचे दर काल शेअर बाजारात मोठी पडझड याआधी गुरुवारी, सेन्सेक्स 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 815.30 अंकांनी किंवा 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला होता. क्रिप्टोकरन्सीमध्येही वाढ क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजाराने शुक्रवारी, 25 फेब्रुवारीला वेग पकडला. बिटकॉइनसह (Bitcoin) जवळपास सर्व प्रमुख करन्सी हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. एकूण जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप कालच्या तुलनेत 10.78 टक्क्यांनी वाढले आहे आणि 1.72 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत क्रिप्टो मार्केट व्हॉल्यूममध्ये 130.88 बिलियन डॉलरवर 29.74 टक्क्यांनी मोठी झेप घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात