मराठी बातम्या /बातम्या /मनी /रिझर्व्ह बँकेने SBI ला ठोठावला 1 कोटींचा दंड, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम

रिझर्व्ह बँकेने SBI ला ठोठावला 1 कोटींचा दंड, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI वर दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI वर दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI वर दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI वर दंड ठोठावला आहे. RBI च्या नियामक निर्देशांचं (Regulatory Directions) पालन न केल्याप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला RBI ने 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, SBI कडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्देश 2016 चं (फ्रॉड्स क्‍लासिफिकेशन अँड रिपोर्टिंग बाय कमर्शियल बँक्स अँड सिलेक्‍ट फाइनेंशियल इंस्‍टिट्यूशन्स) पालन न केल्याप्रकरणी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. RBI ने SBI कडून मेन्टेन केल्या जाणाऱ्या ग्राहकाच्या खात्याची चौकशी केली. या तपासणीत SBI ने RBI च्या सूचनांचं पालन करण्यास विलंब केल्याचं आढळलं. RBI ने ग्राहकाच्या खात्यासह त्याच्या इतर संबंधित गोष्टींचीही पडताळणी केली. त्यात नियमांचं पालन न झाल्याचं आढळल्याने ही कारवाई झाली आहे.

कागद नाही तर या पदार्थापासून तयार होतात नोटा; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

SBI कडून खात्यात फसवणुकीची माहिती RBI ला उशिरा देण्यात आली. SBI ला या प्रकरणात कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. त्यात सूचनांचं पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर दंड का आकारला जाऊ नये? याबाबत SBI ने दिलेल्या उत्तरानंतर RBI ने देशातील सर्वात मोठ्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय दिला.

RBI Imposes monetary penalty of rupees 1 crore on state bank of india know why achs

सर्वसामान्यांनी जगायचं कसं? इंधन दरवाढीमुळे सणासुदीत भाज्यांचे भाव भिडले गगनाला

SBI ग्राहकांवर काय होणार परिणाम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याप्रकरणी बोलताना सांगितलं, की SBI ने कमर्शियल बँका आणि काही निवडक वित्तीय संस्थांकडून (Financial Institutions) ग्राहकांसोबत झालेल्या फसवणुकीचं वर्गीकरण (frauds classification) आणि त्यांचा अहवाल देण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.

बँकिंग अधिनियम 1949 च्या कलम 47ए (1)(सी) च्या तरतुदीनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करुन त्यांनी हा दंड ठोठावला आहे. ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित आहे. परंतु याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँकेकडून ग्राहकांसोबत झालेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता यामुळे प्रभावित होणार नाही.

First published:

Tags: Sbi account, Sbi alert, SBI Bank News