मुंबई : कोरोनानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामागे जागतिक स्तरावरील घडामोडींचा देखील समावेश आहे. रशिया युक्रेन युद्ध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, आर्थिक मंदीचं सावट आणि कोरोना अशा सगळ्याचाच परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. मे महिन्यापासून सलग तीन महिन्यांनंतर RBI आपल्या रेपो रेटमध्ये वाढ करत आहे.
RBI ने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मागच्या मे महिन्यापासून सलग सहाव्यांदा व्याजदरात वाढ केली. यावेळी 0.25 बेसिस पॉईंटने ही दरवाढ केली आहे. कर्ज महाग केली, EMI दर वाढवले एवढं सगळं करुनही महागाईवर नियंत्रण मिळवण्यात RBI ला म्हणावं तेवढं यश अजून मिळालेलं नाही.
रेल्वे स्टेशनवर घेतलेल्या वस्तूवर MRP पेक्षा जास्त पैसे घेतात? मग कुठे करायची तक्रार पाहा
नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये, किरकोळ महागाई पुन्हा अनियंत्रित झाली आणि 6.52 टक्क्यांपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर खूप जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आरबीआय अपयशी ठरली आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
महागाई रोखण्यासाठी, RBI ने रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली, गेल्या 9 महिन्यांत 6 वेळा धोरणात्मक दर बदलले. असे असतानाही महागाई आटोक्यात येऊ शकली नाही. त्यामुळे जनतेचा ईएमआय महाग होणे गरजेचे आहे.
जीवनावश्यक वस्तू दुधापासून ते धान्यापर्यंत सगळ्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. 2022 पासून महागाईवर नियंत्रण तर मिळवता आलं नाही मात्र नुसते EMI आणि कर्ज महाग केले आहेत. आता मे महिन्यात पुन्हा रेपो रेट वाढवणार का याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे पुन्हा कर्ज महाग होणार का याची धाकधूक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news