जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI Credit Policy : होम लोनवर मोठा परिणाम, पाहा किती रुपयांनी वाढणार EMI

RBI Credit Policy : होम लोनवर मोठा परिणाम, पाहा किती रुपयांनी वाढणार EMI

RBI Credit Policy : होम लोनवर मोठा परिणाम, पाहा किती रुपयांनी वाढणार EMI

RBI कडून 0.35 टक्के रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर लोन कितीने महाग होणार EMI किती वाढणार वाचा सविस्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : RBI चे अध्यक्ष शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केलं. पुन्हा एकदा 0.35 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यानंतर व्याजदर सर्वोच्च स्तरावर पोहोचला असून 2018 चा रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारचे लोन महाग होणार आहेत. RBI च्या तीन दिवस झालेल्या बैठकीमध्ये ३५ बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लोन आणि ज्यांनी लोन घेतलं आहे त्यांचे EMI महाग होणार आहेत. CNBC आवाज ने दिलेल्या वृत्तानुसार होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. उदाहरणासाठी सोप्या शब्दात समजून घेऊया. समजा जर एका व्यक्तीने 50 लाखाचं लोन घेतलं. हे लोन घेत असताना व्याजदर 8.55 टक्के होता. लोन 20 वर्षांसाठी घेतलं असेल तर त्याचा EMI साधारण ४३, ५५५ असेल.

RBI MPC Meet: RBI कडून पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ, पाहा EMI चा बोजा किती वाढणार?

RBI ने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर आता त्याचा EMI वाढणार आहे. तर नव्याने लोन घेणाऱ्यांचा EMI जास्त असेल. म्हणजेच त्या व्यक्तीला आता नव्या व्याजदराप्रमाणे ४४, ६५५ रुपये भरावे लागणार आहेत. तर नव्याने व्याज घेणाऱ्या व्यक्तीचा EMI हा 44 हजार 655 असेल. EMI मध्ये एकूण ११०० रुपयांनी वाढ झाल्याचं इथे पाहायला मिळालं आहे.

जाहिरात

RBI ने जाहीर केलेल्या पतधोरणानुसार आता एकूण रेपो रेट 6.25 टक्क्यांवर पोहोतला आहे. MSF रेट 0.35 टक्क्यांनी वाढून 6.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. SDF रेटही 0.35 टक्क्यांनी वाढून 6 टक्क्यांवर पोहोचला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

जगासमोर सध्या खाद्य आणि ऊर्जा या दोन क्षेत्रात मोठं आव्हान आहे. खराब हवामान आणि वाढणारी महागाई यामुळे आर्थिक गणित बघिडलं आहे. महागाईवर नियंत्रणम मिळवणं हा अजूनही चिंतेचा विषय आहे असं शक्तिकांत दास बोलताना म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात