मुंबई : ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा RBI ने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. तीन महिन्यांनी पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार आहे. RBI ने 35 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.
5 ते 7 तीन दिवस मॉनिटरी पॉलिसीवर बैठक झाली. यावेळी 35 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने 35 बीपीएसने वाढवून 6.25% केली आहे. पॉलिसी रेट आता ऑगस्ट 2018 नंतर सर्वोच्च स्तरावर असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे EMI, होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होणार आहेत. जे नवीन लोन घेणार त्यांना वाढलेल्या दराने लोन घ्यावं लागेल. ज्यांचा EMI सुरू आहे त्यांचा EMI वाढणार आहे.
शक्तीकांत दास यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
रशिया-युक्रेन युद्धाचा आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम
महागाई मोठ्या प्रमाणात जगभरात वाढली आहे
इंपोर्टवर मोठा परिणाम झाला आहे
हवामानातील बदलाचा धानावर मोठा परिणाम
भारताची आर्थिक स्थिती सध्या बऱ्यापैकी स्थिर
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने आतापर्यंत चारवेळे रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही रेपो रेटमधील पाचव्यांदा केलेली वाढ आहे. त्यामुळे EMI आणि लोन खूप जास्त महाग झालं आहे. रिझर्व्ह बँकेने यंदा मे महिन्यापासून रेपो दरात 1.90 टक्के वाढ केली आहे. जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news