मुंबई : फार पूर्वीपासून आपल्याकडे काही जणांना नोटेवर लिहिण्याची सवय आहे. काहीजण हिशोब करताना चुकू नये म्हणून नोटेवर आकडे लिहितात. कधीकधी आपल्याकडेही पेनानं लिहिलेली नोट येते. पण आशावेळी ती घ्यायची की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण अशा नोटा चालतात की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
हा संभ्रम निर्माण होण्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे आलेल्या नोटेवर जर लिहिलं असेल तर ती अवैध ठरवली जाणार आहे. या व्हायरल मेसेजचं सत्य नेमकं काय आहे आणि नियम काय सांगतो तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर तुम्ही किती विश्वास ठेवायचा याबद्दल आज जाणून घेणार आहोत.
Kisan Vikas Patra: आता 120 महिन्यांत पैसे दुप्पट; 1 जानेवारीपासून या पोस्ट ऑफिस योजनेचा नियम बदलला
नोटेवर जर लिहिलेलं असेल तर ती नोट अवैध धरली जात नाही. त्यावर काही लिहिलेलं आहे आणि ते बेकायदेशीर आहे म्हणून बँक ती नोट स्वीकारण्यास नकार देत आहे, असं जर कुणी तुम्हाला सांगत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे.
पीएनबीने याबाबत फॅक्ट चेक केलं आहे. हा दावा फोल असल्याने त्यांनी म्हटलं आहे. व्हायरल मेसेजमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार नोटेवर काहीही लिहिल्यास ते बेकायदेशीर ठरेल. ती चलनात वापरता येणार नाही. मात्र हा मेसेज फेक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तुमच्याकडेही जर असा मेसेज आला असेल तर तुम्ही त्याची सत्यता न पडताळता कुणालाही फॉरर्वड करू नका. त्यामुळे अफवा पसरते. RBI ने नोटांवर पेनाने लिहू नका असा सल्ला नागरिकांना दिला आहे. असं केल्याने नोटा खराब होतात. बऱ्याचदा त्या खऱ्या आहेत की नाही हे पडताळणं कठीण होतं. नोटेवर लिहिण्याने त्यांना चुरगळल्याने त्यांचं आयुष्य देखील कमी होतं.
Does writing anything on the bank note make it invalid❓#PIBFactCheck
✔️ NO, Bank notes with scribbling are not invalid & continue to be legal tender ✔️Under the Clean Note Policy, people are requested not to write on the currency notes as it defaces them & reduces their life pic.twitter.com/V8Lwk9TN8C — PIB Fact Check (@PIBFactCheck) January 8, 2023
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार देशातील सामान्य माणसाला व्यवहारात चांगल्या प्रतीच्या बँक नोटा मिळाल्या आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांनी कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या नोटांवर पेनाने लिहू नये. कोणतेही शिक्के, पेनाने लिहिणे शाई लावणे असे कोणतेही प्रयोग करू नयेत. कोणत्याही प्रकारची खूण करू नये. तसेच माळा, खेळणी, मंडप किंवा धार्मिक स्थळे सजवण्यासाठी नोटांचा वापर करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Rbi, Rbi latest news