मुंबई, 7 जानेवारी : गुंतवणुकीचे सध्या असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अनेक जण सरकारी योजनांकडे वळत असतात. सरकारी योजनांमध्ये सध्या किसान विकास पत्र हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पूर्वीच्या तुलनेत आता ही योजना अधिक लाभदायी ठरत असून गुंतवणूक केलेली रक्कम 120 महिन्यांमध्ये दुप्पट होत आहे. सुरक्षित भविष्यासाठी तरतूद करण्याच्या दृष्टीने तुम्ही गुंतवणुकीची योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या अनेक लोकप्रिय योजना आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. केंद्राने अल्पबचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात 1.10% वाढ केली आहे. याचा विचार केला तर किसान विकास पत्रांचे व्याजदर 20 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. सरकारने हे पाऊल उचलल्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराची रक्कम पूर्वीच्या तुलनेत तीन महिने आधीच दुप्पट होत आहे. केंद्राच्या घोषणेनंतर वाढले व्याजदर केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 नंतर किसान विकास पत्रामध्ये गुंतवणुकीची रक्कम 123 महिन्यांच्या ऐवजी 120 महिन्यांत दुप्पट होणार असल्याची घोषणा केली आहे. व्याजदरात वाढ केल्यानंतर किसान विकास पत्रात गुंतवणुकीवर 7.20% दराने व्याज मिळेल. व्याजदरात वाढ होण्याच्या आधी या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 123 महिने गुंतवणुकीवर सात टक्के दराने व्याज मिळत होता नवीन बदलानुसार याची मुदत आता 10 वर्ष झाली आहे. वाचा - तुमच्या कामाची बातमी! KYC बाबत RBI कडून मोठी अपडेट, लगेच चेक करा एक हजार रुपयांपासून सुरू करता येईल गुंतवणूक पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्ही फक्त एक हजार रुपये गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित नाही. योजनेसाठी एक व्यक्ती किंवा जॉइंट अकाउंट काढता येते. यासोबतच गुंतवणुकीवर नॉमिनीची सुविधाही दिली आहे.
असं काढता येईल खातं किसान विकास पत्र योजनेमध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे अकाउंटही काढता येते. त्याच्या वतीनं प्रौढ व्यक्तीला हे खातं काढावं लागतं. दहा वर्षांपेक्षा अधिक वय झाल्यानंतर अकाउंट संबंधित व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर केलं जातं. या योजनेत खातं उघडणं अत्यंत सोपं आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज भरावा लागतो. त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून जमा केली जाते. योजनेचा अर्ज करताना यासोबत ओळखपत्र जोडावं लागतं. त्यानंतर अर्ज आणि पैसे जमा केल्यावर तुम्हाला किसान विकास पत्राचं सर्टिफिकेट मिळतं.