जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI Tokenization Rules: बदलणार आहे कार्ड पेमेंट करण्याची पद्धत, RBI ने जारी केले नियम; वाचा सविस्तर

RBI Tokenization Rules: बदलणार आहे कार्ड पेमेंट करण्याची पद्धत, RBI ने जारी केले नियम; वाचा सविस्तर

RBI Tokenization Rules: बदलणार आहे कार्ड पेमेंट करण्याची पद्धत, RBI ने जारी केले नियम; वाचा सविस्तर

RBI Tokenization Rules: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट संदर्भातील टोकनायझेशन नियम जारी केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: पुढील वर्षी नव्या वर्षात नवीन पद्धतीने  पेंमेट (Payment way) करता येणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून कार्डच्या माध्यमातून पेमेंट (Card payment) करण्याची पद्धत बदलणार आहे. त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट संदर्भातील टोकनायझेशन नियम जारी  (RBI tokenization rules) केले आहेत. अर्थात आता पेमेंट करता टोकन सिस्टिम लागू करण्यात येणार आहे. आरबीआयने डेटा स्टोरेजशी संबंधित टोकनचे नियम जारी केले आहेत. 1 जानेवारी 2022 पासून कार्ड व्यवहार/पेमेंटमध्ये कार्ड जारी करणारी बँक किंवा कार्ड नेटवर्कव्यतिरिक्त कुणीही वास्तविक कार्ड डेटाचं स्टोरेज करणार नाही. यामध्ये कार्ड होल्डरच्या गोपनीयतेसाठी तरतुद करण्यात आली आहे. आरबीआयच्या टोकनायझेशन नियमांनुसार, पेमेंट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना डिसेंबर 2021 नंतर ग्राहक कार्ड डेटा गोळा करण्याची परवानगी नाही. तसेच टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपुट करण्याची आवश्यकता राहणार नाही. टोकन व्यवस्था ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल. ती घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव आणता येणार नाही. या व्यतिरिक्त, कोणत्याही बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून याची सक्ती केली जाणार नाही.

News18

ही टोकन व्यवस्था मोबाइल, लॅपटॉप, डेक्सटॉप आणि स्मार्ट वॉचच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पेमेंटच्या माध्यमावर लागू होईल. ही सेवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जारी केली जाईल. कार्ड डेटा टोकन स्वरुपात जारी करण्याची सुविधा एकाच टोकन सर्व्हिस प्रोव्हायडरसह असेल. मात्र याकरताही ग्राहकांची परवानगी आवश्यक असेल. हे वाचा- कमाईची आणखी एक संधी! 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक? आता काय आहे कार्ड पेमेंट सिस्टिम? 1 जानेवारी 2022 पासून तुम्हाला तुमच्या कार्डची डिटेल्स कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसह शेअर करावी लागणार नाही. सध्या असा नियम नाही आहे. आता तुम्ही जर झोमॅटोवरून जेवण मागवताय किंवा ओला बुक करत असाल तर तुम्हाला कार्ड डिटेल्स द्यावे लागतात आणि याठिकाणी ग्राहकाच्या कार्डचा तपशील सेव्ह होते. यामुळे फ्रॉड होण्याची शक्यताही असते. टोकनायझेशन सिस्टिम अशी नसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात