मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Alert! तुम्ही देखील करताय जुन्या नाणी-नोटांची विक्री तर सावधान, RBI ने जारी केली महत्त्वाची सूचना

Alert! तुम्ही देखील करताय जुन्या नाणी-नोटांची विक्री तर सावधान, RBI ने जारी केली महत्त्वाची सूचना

आपल्या ‘कलेक्शन’मध्ये दुर्मीळ नाणी (Rare coins collection) असावीत यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही मोजण्यास तयार असतात. मात्र, अशा दुर्मिळ गोष्टींच्या खरेदीदरम्यान फसवणूक (Rare coins buying fraud) होण्याची शक्यताही अधिक असते.

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: बऱ्याच लोकांना जुनी नाणी किंवा नोटा या संग्रही ठेवण्याचा छंद असतो. कित्येक लोक आपल्या ‘कलेक्शन’मध्ये दुर्मिळ नाणी (Rare coins collection) असावीत यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही मोजण्यास तयार असतात. मात्र, अशा दुर्मिळ गोष्टींच्या खरेदीदरम्यान फसवणूक (Rare coins buying fraud) होण्याची शक्यताही अधिक असते. गेल्या काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटा यांच्या व्यवहारांदरम्यान होणाऱ्या फसवणुकीबाबत मोठ्या प्रमाणात बातम्या समोर येत आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारच्या नोटा आणि नाणी विक्रीसाठी काही लोक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), म्हणजेच आरबीआयने जुनी नाणी आणि नोटांच्या खरेदी-विक्री (Old notes and coins) संबंधी अलर्ट जारी केला आहे.

ट्विटरमार्फत नागरिकांना केलं आहे आवाहन

रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारची खरेदी-विक्री करताना सावध राहण्याचं आवाहन देशाच्या नागरिकांना केलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (RBI twitter) त्यांनी हे आवाहन प्रसिद्ध केले आहे. यात आरबीआय म्हणते, की गेल्या काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटांच्या विक्रीदरम्यान काही लोक खरेदीदाराकडून कमिशन किंवा टॅक्स (Commission for buying rare coins) मागत आहेत. विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म्सवर हा प्रकार दिसून आला आहे. हे कमिशन वा टॅक्स आरबीआयच्या किंवा आरबीआयमधील अधिकाऱ्यांच्या नावाने घेतले जात आहेत. पण आरबीआय अशा प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहारात सहभागी नाही. तसंच, जुनी नाणी किंवा नोटांच्या व्यवहारासाठी आरबीआय कोणतेही कमिशन वा कर (Charges for buying rare coins) लागू करत नाही; असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

हे वाचा-LPG बुकिंगवर 2700 रुपयांपर्यंत कॅशबॅक, आता बुक करुन नंतर पे करण्याचीही ऑफर

कमिशन घेण्याचा कुणालाही नाही अधिकार

जुनी नाणी किंवा नोटा यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात आरबीआय कोणत्याही प्रकारे सहभागी नसते. अशा प्रकारचा व्यवहार करण्यासाठी किंवा त्यावर कमिशन वा कर आकारण्यासाठी आरबीआयने कोणत्याही संस्थेला परवानगी वा अधिकार (Who can sell old and rare coins) दिले नसल्याचेही भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकांनी जुनी नाणी वा नोटा विकत घेताना सतर्क राहावे. आरबीआय किंवा आरबीआय अधिकाऱ्याच्या नावाने कोणी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास, त्या जाळ्यात अडकू नये; असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे.

हे वाचा-SBI Alert! एसबीआयने बंद केली 60000 खाती, यामध्ये तुमचं अकाउंट तर नाही आहे ना?

कमिशनव्यतिरिक्त आणखीही बऱ्याच प्रकारे लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः ऑनलाईन खरेदी करताना विक्री करणारी व्यक्ती वा संस्था किती विश्वासार्ह आहे याची खातरजमा करुन घेणं आवश्यक आहे. जुनी नाणी वा नोटा घेताना शक्यतो प्रत्यक्षात ती नाणी किंवा नोटा पहाव्या आणि नंतरच पैसे देऊन त्या खरेदी कराव्या असा सल्लाही देण्यात येत आहे.

First published: