नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: सध्या डिजिटल व्यवहारांचा (Digital Transactions) ट्रेंड झपाट्यानं वाढत आहे. आज आपण अनेक वेबसाइटस आणि अॅप्सच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करतो. मात्र त्याचवेळी फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्येही वाढ होत आहे. ही फसवणूक अनेक प्रकारे होत असल्याचं दिसून आलं आहे. लिंकच्या माध्यमातून, अनोळखी क्रमांकावर बँकिंग विषयक वैयक्तिक माहिती शेअर केल्यानं फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास प्रसंगी मोठं अर्थिक नुकसानही होऊ शकतं. तसेच माहितीचा गैरवापर होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा फसवणूकीपासून सावध राहावं, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा दिला आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती फसवणुकीसाठी नवनवीन पद्धतींचा वापर करत असल्याने केंद्रीय बँकेने ग्राहकांना जागरूक राहण्यास सांगितले आहे. अगदी सोप्या उपायांच्या माध्यमातून अशी फसवणूक टाळता येते. फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात याबाबत आता जाणून घेऊया.
हे वाचा-Gold Price Today:दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोनं-चांदी महागलं, खरेदीआधी पाहा दर
आरबीआयने ट्वीट करून दिली माहिती
बँकिंग व्यवहारांसाठी सुरक्षित वेबसाइट आणि अॅप्सचा वापर करा. व्यवहारांसाठी सार्वजनिक नेटवर्क (Public network) टाळा. सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सुरूवात तुमच्यापासून होते, असं ट्वीट भारतीय रिझर्व्ह बॅंकेने केलं आहे.
. @RBI कहता है.. बैंकिंग लेनदेन के लिए सुरक्षित वेबसाइटों और ऐप्स का उपयोग करें। लेनदेन के लिए सार्वजनिक नेटवर्क से बचें। सुरक्षित डिजिटल लेनदेन आप से शुरू होते हैं।#PayDigital #StaySafe#beaware #besecure #digitalsafety#rbikehtahai https://t.co/mKPAIpnAOb pic.twitter.com/cYyWDqGHPs
— RBI Says (@RBIsays) February 1, 2022
अशा प्रकारे होते फसवणूक
सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी बँक किंवा वित्तीय कंपनीच्या 1800 123 1234 (हा खरा क्रमांक नाही) अशा टोल फ्री क्रमांकाशी (Toll Free Number) मिळताजुळता (800 123 1234) क्रमांक मिळवतात. त्यानंतर आरोपी हा क्रमांक ट्रु कॉलर किंवा अन्य अॅप्लिकेशनवर बँक किंवा वित्तीय कंपनीच्या नावाने रजिस्टर्ड करतात. अशा परिस्थितीत तुम्ही Truecaller च्या मदतीनं बॅंक किंवा वित्तीय कंपनीला फोन केला तर अनेक वेळा हा फोन सायबर गुन्हेगाराकडे जातो आणि ते तुमच्याकडून सर्व माहिती मिळवतात. या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करतात. अशा प्रकरणात तुमचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
हे वाचा-आता घरबरल्या Driving License मध्ये असा बदला Address, RTOमध्ये जाण्याचं No टेन्शन
अशी टाळा फसवणूक
तुम्ही कोणत्याही बॅंक किंवा वित्तीय कंपनीला फोन कॉल (Phone Call) करणार असाल, तर तुमच्याकडे संबंधित बॅंक किंवा वित्तीय संस्थेच्या टोल फ्री क्रमांकाची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तसेच कोणत्याही बॅंकेच्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तुमची सर्व माहिती कधीही शेअर करू नका. अशा प्रकारे काळजी घेतल्यास संभाव्य फसवणूक टाळता येते आणि आर्थिक नुकसानदेखील होत नाही. तसेच सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करतात, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार करताना किंवा माहिती शेअर करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital services, Online, Online crime, Online fraud, Rbi, Rbi latest news, Toll Free