Home /News /money /

Gold Price Today: मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोनं-चांदी महागलं, खरेदीआधी इथे पाहा दर

Gold Price Today: मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोनं-चांदी महागलं, खरेदीआधी इथे पाहा दर

मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज 4 फेब्रुवारी शुक्रवारी सोने-चांदी दरात तेजी आहे. या वाढीनंतर सोन्याचा दर (Gold Price Today) 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम जवळपास आहे.

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज 4 फेब्रुवारी शुक्रवारी सोने-चांदी दरात तेजी आहे. या वाढीनंतर सोन्याचा दर (Gold Price Today) 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम जवळपास आहे. गुरुवारी सोने दरात 0.07 टक्क्यांची घसरण झाली होती. त्याशिवाय चांदीचा दरही (Silver Price) 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. काय आहे आजचा सोने-चांदी दर (Gold Silver Price Today) - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा दर 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 47,953 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरात 0.39 टक्क्यांची तेजी आहे. आज एक किलोग्रॅम चांदीचा दर 60,971 रुपये आहे. 2020 मध्ये जवळपास याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर डिसेंबर वायदे भाव 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजेच आता सोनं जवळपास 8,400 रुपये स्वस्त मिळतं आहे.

    हे वाचा - Petrol Price Today:पेट्रोल-डिझेल दरात काय झाले बदल?पाहा तुमच्या शहरातील आजचा रेट

    दरम्यान, कोरोना काळतही सोन्याची मागणी वाढल्याने भारतात 2021 मध्ये सोन्याचा व्यापार 797.3 टन इतका झाला. या नव्या वर्षातही वाढीचा कल कायम राहण्याची आशा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) गोल्ड डिमांड ट्रेंड 2021 अहवालात सांगितलं, की 2020 मध्ये सोन्याची मागणी 446.4 टन वरुन 2021 मध्ये 78.6 टक्के वाढीसह 797.3 टन इतकी झाली. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - बँक ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' 4 बँकांनी बदलले आहेत महत्त्वाचे नियम

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Finance, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Money, Multi exchange commodity

    पुढील बातम्या