मराठी बातम्या /बातम्या /मनी /Ration Card बाबत केंद्र सरकारचा निर्णय, लगेच करा अपडेट

Ration Card बाबत केंद्र सरकारचा निर्णय, लगेच करा अपडेट

Ration Card: रेशन कार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती परंतु आता ही तारीख वाढवून 30 जून करण्यात आली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने यासाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

नवी दिल्ली, 11 मे : तुम्ही अद्यापही रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card Link To Aadhaar Card) केलं नसेल, तर हे काम लवकर पूर्ण करा. केंद्र सरकारने लाभार्थिंना आणखी एक संधी दिली आहे. रेशन कार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती परंतु आता ही तारीख वाढवून 30 जून करण्यात आली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने यासाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder) सरकारकडून कमी दरात धान्य दिलं जातं. केंद्र सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) योजनेअंतर्गत देशात लाखो लोकांना याचा फायदा मिळतो. रेशन कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केल्यानंतर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्डद्वारे इतर कोणत्याही राज्यातील रेशन धान्य दुकानातून धान्य घेता येतं.

ऑनलाइन कसं लिंक कराल आधार कार्ड -

- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

- इथे Start Now वर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा पत्ता, जिल्हा, राज्य असे डिटेल्स भरावे लागतील.

- त्यानंतर 'Ration Card Benefits' वर क्लिक करा.

- इथे आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, ईमेल, मोबाइल नंबर डिटेल्स भरा.

- त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

- OTP टाका. त्यानंतर स्क्रिनवर प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.

- त्यानंतर आधार वेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक होईल.

हे वाचा - Duplicate Ration Card: रेशन कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी नो टेन्शन, सोप्या पद्धतीने असं बनवा

ऑफलाइन असं करा लिंक -

रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी काही डॉक्युमेंट आधार कार्ड कॉपी, रेशन कार्ड कॉपी आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट साइज फोटो रेशन कार्ड केंद्रात जमा करावा लागेल. त्याशिवाय रेशन कार्ड केंद्रात तुमचं आधार कार्ड बायोमेट्रिक डेटा वेरिफिकेशनही होऊ शकतं.

First published:

Tags: Aadhar card link, Ration card