Home /News /technology /

Duplicate Ration Card: रेशन कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी नो टेन्शन, सोप्या पद्धतीने असं बनवा

Duplicate Ration Card: रेशन कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी नो टेन्शन, सोप्या पद्धतीने असं बनवा

अनेकदा हे महत्त्वाचं डॉक्युमेंट हरवतं किंवा चोरी गेल्याने समस्या येऊ शकते. रेशन कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर काय कराल? अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. कोणत्याही समस्येशिवाय रेशन कार्ड पुन्हा बनवता येऊ शकतं.

  नवी दिल्ली, 26 जानेवारी : सरकारकडून जारी केलं जात असलेलं रेशन कार्ड (Ration Card) अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे. या कार्डद्वारे रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder)  धान्य मिळतं. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांप्रमाणे रेशन कार्डही महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. रेशन कार्ड अनेक ठिकाणी आयडी प्रुफ (ID Proof) म्हणूनही वापरलं जातं. अनेकदा हे महत्त्वाचं डॉक्युमेंट हरवतं किंवा चोरी गेल्याने समस्या येऊ शकते. रेशन कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर काय कराल? अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. कोणत्याही समस्येशिवाय रेशन कार्ड पुन्हा बनवता येऊ शकतं. रेशन कार्ड पुन्हा बनवताना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर डुप्लिकेट कार्ड (Duplicate Ration Card) सहजपणे बनवता येईल. जाणून घ्या डुप्लिकेट रेशन कार्ड बनवण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत - ऑनलाइन असं बनवा डुप्लिकेट रेशन कार्ड - - सर्वात आधी राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. - त्यानंतर एक होम पेज ओपन होईल. त्यानंतर डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करावं लागेल. - लिंकवर क्लिक केल्यानंतर एक ऑनलाइन फॉर्म ओपन होईल. फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती इथे भरावी लागेल. - आता काही कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर ती सबमिट करा. अशा स्टेप्सद्वारे तुम्ही डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकाल.

  हे वाचा - Aadhaar Update:युजर्ससाठी मोठी बातमी, आधार अपडेटसाठी नवी सर्विस; UIDAI ची माहिती

  ऑफलाइन असं बनवा डुप्लिकेट रेशन कार्ड - - सर्वात आधी जिल्ह्याच्या अन्न आणि पुरवठा नियंत्रक कार्यालयात जावं लागेल. - इथे कुटुंबातील सदस्यांचे दोन पासपोर्ट साइज फोटो देणं अनिवार्य आहे. त्यानंतर डुप्लिकेट रेशन कार्ड फॉर्म भरावा लागेल. - फॉर्म भरल्यानंतर डिपो होल्डर रिपोर्ट, पेनल्टी फीस तसंच कुटुंबातील सदस्यांचे फोटो सबमिट करावे लागतील. - वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला याबाबत माहिती दिली जाईल आणि डुप्लिकेट रेशन कार्ड मिळेल.

  हे वाचा - भाडेकरु Aadhaar मध्ये कसा करतील Address Update, पाहा UIDAI ची सोपी प्रोसेस

  कोणत्या कागदपत्रांची गरज असेल? डुप्लिकेट रेशन कार्ड बनवण्यासाठी रेशन कार्ड नंबर, सर्व सदस्यांचं आधार कार्ड, कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो आणि काही इतर कागदपत्र असणं अनिवार्य आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Ration card, Tech news

  पुढील बातम्या