Home /News /money /

कार लोन EMI दीर्घकालीन फायदेशीर की हानिकारक? समजून घ्या संपूर्ण हिशेब

कार लोन EMI दीर्घकालीन फायदेशीर की हानिकारक? समजून घ्या संपूर्ण हिशेब

Car Loan: जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी कार लोन घेता तेव्हा गाडी खूप महाग होते. यामुळे वाहनाची किंमत 25 टक्क्यांपर्यंत वाढते. दुसरीकडे, तुम्ही कमी कालावधीसाठी कर्ज घेतल्यास, तुम्हाला त्यापेक्षा कमी किंमत मोजावी लागेल.

    मुंबई, 29 मे : कार खरेदी करणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. विशेषत: कोरोनानंतर (Coronavirus) नोकरदार व्यक्ती कार खरेदीसाठी खूप गंभीर दिसत आहेत. मात्र, सामान्य माणसासाठी कार खरेदी करण्यासाठी कर्ज (Car Loan) हे महत्त्वाचे साधन आहे. जर तुम्ही कर्जाद्वारे कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही EMI कालावधीबद्दल काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कर्जाचा कालावधी (Loan Tenure) लांब ठेवायचा की कमी हे देखील महत्त्वाचे आहे. बँकिंग तज्ञांच्या मते, एखाद्याने कर्जाचा कालावधी शक्य तितका कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. EMI कालावध जास्त ठेऊ नये. तुम्ही जास्त कालावधीसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. दीर्घ मुदतीच्या कर्जाचे (Long Term Loan) अनेक तोटे आहेत. कॅलक्युलेशन समजून घेऊ साधारणपणे, एखादी व्यक्ती 3 ते 5 वर्षांसाठी कार लोन घेते आणि कमाल कर्ज जास्तीत जास्त 8 वर्षांसाठी घेता येते. पण जितका वेळ जास्त तितके जास्त व्याज द्यावे लागेल. तुम्ही 7 ते 8 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, व्याजदर अल्प कालावधीसाठी व्याजदरापेक्षा 0.50% जास्त असू शकतो. तुमच्याकडील 500, 2000 ची नोट बनावट तर नाही ना? रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टने वाढली चिंता कारची किंमत जास्त जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी कार लोन घेता तेव्हा गाडी खूप महाग होते. यामुळे वाहनाची किंमत 25 टक्क्यांपर्यंत वाढते. दुसरीकडे, तुम्ही कमी कालावधीसाठी कर्ज घेतल्यास, तुम्हाला त्यापेक्षा कमी किंमत मोजावी लागेल. विक्री समस्या समजा तुम्ही 8 वर्षांसाठी कार लोन घेत आहात. जर तुम्हाला कार 5 वर्षानंतरच विकायची असेल तर तुम्हाला आधी संपूर्ण कर्ज फेडावे लागेल. दुसऱ्या प्रकरणात, कर्ज दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करावे लागेल. यामध्ये खूप त्रास होत असून बँकेतही जावे लागते. LIC Jeevan Labh योजनेत 10 रुपयांहून कमी गुंतवणूक करुन मिळवा 17 लाख, वाचा सविस्तर कार किती महाग आहे? 8 लाखांची कार आणि 5 लाख कर्ज, वेगवेगळ्या कालावधीसाठी घेतल्यास त्याचा हिशोब काय असेल. किती व्याज द्यावे लागेल आणि गाडीची किंमत किती असेल. समजा तुमच्या कर्जाची रक्कम 5 लाख रुपये आहे. तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेतलं. जर तुमच्या कर्जावरील व्याज 8 टक्के असेल तर EMI 10,138 रुपये येईल. म्हणजेच 6.08 लाख रुपये दिले जातील. म्हणजे तुम्हाला 1.08 लाख रुपये जास्त द्यावे लागतील. जर तुम्ही हे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला 8 टक्के व्याजदराने 7068 रुपये मासिक EMI मिळेल. तुम्हाला एकूण 1.78 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजे 8 लाखांच्या कारची किंमत 9.78 लाख असेल. जर तुम्ही हे 3 वर्षांसाठी केले तर तुमचा मासिक EMI वाढेल परंतु तुम्हाला फक्त 64 हजार रुपये व्याज द्यावे लागेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Car, Loan, Money

    पुढील बातम्या