मुंबई, 30 मे : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. सोमवारी सकाळी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरच्या जवळ पोहोचली. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या दबावातही कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत बदल केलेला नाही. आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 119.8 डॉलर होती, तर WTI प्रति बॅरल 115.6 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या दबावाखालीही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते, तर राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती. या कारवाईमुळे इंधनाच्या दरात मोठी घसरण झाली. देशात सतत वाढत असलेल्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला. कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. आजच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे. तुमच्याकडील 500, 2000 ची नोट बनावट तर नाही ना? रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टने वाढली चिंता काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा कंपन्यांवर किमती वाढवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर » मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर » दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर » चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर » कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. Masked Aadhar Card: मास्क्ड आधारकार्डबद्दल माहित आहे का? कुठे केला जातो वापर? चेक करा सर्वकाही तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.