रांची, 21 मार्च: देशातील तरुणांमध्ये आयडियाची कमतरता नाही. आपल्या नव्या आणि अनोख्या विचारसरणीला चालना देण्यासाठी ते देश-विदेशातील चांगल्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सुरू करतात. यामुळे त्यांनाच नव्हे तर अनेक नवीन लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतेय. अशीच एक आयडिया झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी विनोद टोप्पोच्या मनात आली. विनोदने परदेशात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेय. पण त्याला नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. मग काय पठ्ठ्याने परदेशातील नोकरी सोडून आपल्या मायदेशाच बिझनेस सुरु केला. विनोद टोप्पोने न्यूज 18 ला सांगितले की, ‘मी परदेशात नोकरी केली, पण माझे मन नेहमीच रांचीमध्ये होते. मला हाउस किचन बनवायचे होते. पण, त्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. त्यामुळेच मी काही वर्षे मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. 2020 मध्ये, कोरोनाच्या वेळी, मी माझी नोकरी सोडून रांचीला आलो, आणि माझ्या घरात हाउस किचन उघडले.
जॉब सोडून पती-पत्नीने लावला चहाचा स्टॉल, आता दुकानासमोर लागतात रांगा!हाउस किचन म्हणजे काय?
विनोद सांगतात की, हाऊस किचन अंतर्गत तुम्ही तुमच्या घरात पदार्थ तयार करुन गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवता. माझ्या हाउस किचनमध्ये 15 प्रकारचे पदार्थ बनवले जातात जसे- नाचणी मोमो, पनीर मोमो, बिर्याणी, नाचणीचे लाडू, तांदळाचा चिल्का, नाचणीचा चिल्का जो आपण इथे घरात बनवतो. त्यानंतर रांचीची सुमारे 10 आणि 15 हॉटेल्स आणि हातगाड्यांवर पाठवली जातात. आम्ही दररोज सुमारे 30 किलो बिर्याणी, 2000 पीस मोमोज, 100 अंडी आणि चिकन रोल बनवतो आणि पाठवतो.
काय सांगता! येथील महिला बनवताय बाजरीचा पिझ्झा अन् केक, पंतप्रधानांनीही केलंय कौतुकविदोद यांनी पुढे सांगितले की, काही वेळा पार्टी किंवा कॉर्पोरेट जगताकडूनही चांगले ऑर्डर येतात. आज 200 हून अधिक लोक आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यापैकी 150 महिला आहेत. त्यांना व्यवसायाची चांगली संधी मिळाली आहे. हे 200 लोक त्यांच्या घरून पदार्थ तयार करतात आणि आमच्याकडे पाठवतात. आम्ही त्यांना दररोज त्यांच्या पदार्थांच्या क्वांटिटीनुसार पेमेंट देतो.
आदिवासी समाजाला पुढे नेण्याचा उद्देश
विनोदने सांगितले की, मी फ्लिपकार्ट, नोकियासारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या पॅकेजवर (पगारावर) काम केले आहे. परंतु मला नेहमी वाटायचे की, आपल्या आदिवासी बांधवांना रोजगाराअभावी दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. या हाउस किचनमधून आम्ही त्यांना दररोज ऑर्डर देतो आणि दररोज त्यांना पैसे देखील दिले जातात. त्यामुळे घरी बसून त्यांना रोजगाराची संधीही मिळाली. विशेषत: महिलांना घराबाहेर पडण्याची गरज नाही कारण आम्ही घरातून ऑर्डर घेतो. विनोद सांगतात की, जर कोणाला आमच्यात सामील व्हायचे असेल तर तो सामील होऊ शकतो. यासाठी कोणतीही पात्रता आवश्यक नाही, उलट, जर तुम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे देखील माहित नसेल तर आम्ही ते देखील शिकवू. यामुळे त्यांच्या हातात स्किल विकसित होते आणि ते भविष्यात स्वतःहून काहीतरी करू शकतात. तुम्हालाही विनोद टोप्पोच्या हाउस किचनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही त्यांच्याशी 83360-70979 या नंबरवर संपर्क साधू शकता.