जाहिरात
मराठी बातम्या / मनी / राकेश झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात 300 कोटींची घट, 'या' शेअरमुळे मोठं नुकसान

राकेश झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात 300 कोटींची घट, 'या' शेअरमुळे मोठं नुकसान

राकेश झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात 300 कोटींची घट, 'या' शेअरमुळे मोठं नुकसान

स्टार हेल्थ हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala portfolio) दुसरा सगळ्यात मोठा शेअर आहे. झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रमोटरही आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 2 ऑगस्ट : भारतीय शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची कित्येक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. यांपैकीच एका कंपनीचे शेअर्स सोमवारी गडगडल्यामुळे त्यांना 327 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ही कंपनी आहे, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स. या कंपनीने (Star Health and Allied Insurance Company) भूतकाळात शेअर बाजारात अगदी चांगलं प्रदर्शन केलं होतं. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनी नफ्यात आली होती. गेल्या एका महिन्यांत कंपनीच्या शेअरने 57 टक्के रिटर्न्स दिले होते. मात्र त्यानंतर प्रॉफिट बुकिंगच्या दबावामुळे हे शेअर्स (Star Health Shares) पडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्येदेखील स्टार हेल्थचा शेअर असेल, तर तातडीने त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील मोठा शेअर शेअर व्हॅल्यु पाहता, स्टार हेल्थ हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala portfolio) दुसरा सगळ्यात मोठा शेअर आहे. झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रमोटरही आहेत. सोमवारी स्टार हेल्थचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 4.37 टक्के कमी होऊन, 710.20 रुपयांवर बंद झाला. इंट्राडेमध्ये या शेअरने सर्वाधिक 765 रुपये आणि सर्वांत कमी 705 रुपयांचा स्तर गाठला होता. सध्या कंपनीची मार्केट कॅप सुमारे 41 हजार कोटी रुपये आहे. एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर झुनझुनवालांचे शेअर किती? 30 जून 2022 पर्यंत राकेश झुनझुनवाला यांचे स्टार हेल्थमध्ये 14.39 टक्के शेअर्स होते. तसंच, त्यांच्या पत्नीचे याच कंपनीत 3.10 टक्के शेअर्स होते. म्हणजेच या दोघांचे मिळून कंपनीत एकूण 17.49 टक्के शेअर्स (Rakesh Jhunjhunwala Star Health shares) होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्टार हेल्थ शेअर बाजारात दाखल झाला होता. यावेळी शेअरची इश्यु प्राईज 900 रुपये होती. सध्याचा दर पाहता, शेअरची किंमत इश्यु प्राईजपेक्षा सुमारे 22 टक्के कमी झाल्याचं (Star Health share price) दिसून येतं. नागपुरात CNGचा भडका! पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी यावर्षी उत्तम नफा 2022 च्या जून महिन्यात संपलेल्या तिमाहीमध्ये स्टार हेल्थने 213.24 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. 2021 च्या याच तिमाहीत कंपनीने 209.78 कोटी, तर यापूर्वीच्या तिमाहीमध्ये 82 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान कंपनीचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 2,331.90 कोटी रुपयांवरून वाढून 2,809.01 कोटी रुपये झाले आहे. एकूणच 2022 च्या जून तिमाहीत कंपनीने आधीचे नुकसान भरून काढले होते. मात्र त्यानंतर प्रॉफिट बुकिंगमुळे कंपनीचे शेअर गडगडले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात