जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नागपुरात CNGचा भडका! पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी

नागपुरात CNGचा भडका! पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी

नागपुरात CNGचा भडका! पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी

नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. देशातील सर्वात महागडी CNG हे नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 2 ऑगस्ट : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिलं जात होतं. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात. मात्र त्यांच्याच नागपूरमध्ये CNG दराचा उडाला भडका आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. देशातील सर्वात महागडी CNG हे नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. मुंबईत सीएनजी 80 रुपये दराने विकलं जात आहे. एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर CNG वितरण कंपनी ग्राहकांना सरकारी सबसिडी न देता गॅस विकत असल्याचा ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे एवढ्या महाग दरात सीएनजी विकत घ्यावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. नागपूरचे CNG वितरणाचे कंत्राट हरियाणा गॅस डिस्ट्रीन्यूटरकडे आहे. राज्यातील नाहीतर देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे. तर राज्यातील सर्वात स्वस्त सीएनजी हे नाशिकमध्ये विकलं जात आहे. नाशिकमध्ये सीएनजीचे दर 67.90 रुपये आहे. महाराष्ट्रात सीएनजी सरासरी 82.60 रुपायांना विकलं जात आहे. ITR Verification: मुदत संपली तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? कारवाई टाळण्यासाठी करा ‘हे’ काम राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर » मुंबई- 80 रुपये » पुणे- 85 रुपये » ठाणे- 80 रुपये » नाशिक - 67.90 रुपये » नवी मुंबई- 80 रुपये » पिंपरी चिंचवड- 85 रुपये » धुळे- 67.90 रुपये

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात