• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Rakesh Jhunjhunwala Portfolio : महिनाभरात 'या' स्टॉकमध्ये 20 टक्के रिटर्न्सचा अंदाज

Rakesh Jhunjhunwala Portfolio : महिनाभरात 'या' स्टॉकमध्ये 20 टक्के रिटर्न्सचा अंदाज

Fortis Healthcare stock राकेश झुनझुनवाला स्टॉक चार्ट पॅटर्नवर पॉझिटिव्ह दिसत आहे आणि तो 300 ते 302 च्या वर नवीन ब्रेकआउट देऊ शकतो. बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवर हा पोर्टफोलिओ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर (Rakesh Jhunjhunwala Portfolio) किरकोळ गुंतवणूकदारांचं (Retail Investors) बारकाईने लक्ष असतं. कारण राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ त्यांना वॅल्यू शेअर निवडण्यास मदत करतो. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी, तज्ज्ञांचं फोर्टिस हेल्थकेअर स्टॉकवर (Fortis Healthcare Stock) हाय टार्गेटसह लक्ष आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राकेश झुनझुनवाला स्टॉक चार्ट पॅटर्नवर पॉझिटिव्ह दिसत आहे आणि तो 300 ते 302 च्या वर नवीन ब्रेकआउट देऊ शकतो. बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवर हा पोर्टफोलिओ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांना एका महिन्यात त्यात 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. Choice Broking चे सुमीत बगाडिया यांनी फोर्टिस हेल्थकेअर शेअर्सच्या शॉर्ट टर्म टार्गेट किमतीबद्दल बोलताना म्हटलं की, फोर्टिस हेल्थकेअर स्टॉक 260 लेव्हलवर टिकण्यासह जास्त वाढीसह चार्ट पॅटर्न दाखवत आहे. शेअर लवकरच 300 ते 302 रुपयांच्या क्लोजिंग बेसिसवर ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. या ब्रेकआउटनंतर, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक अल्पावधीत 340 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. शेअरमध्ये 260 च्या स्टॉप लॉससह 1 महिन्यात 340 रुपयांच्या टार्गेटवर जाऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या सध्याच्या बाजारभावावर हा शेअर खरेदी केला जाऊ शकतो. घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का; बिल्डर्स घरांच्या किमती वाढवण्याच्या तयारी सुमीत बगाडिया पुढे म्हणाले की, फोर्टिस हेल्थकेअरच्या शेअर्समध्ये एका आठवड्यात सुमारे 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्यामुळे वरच्या स्तरावरून काही प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. पण शेअरला 260 वर मजबूत सपोर्ट आहे आणि त्यामुळे काउंटरमधील कोणतीही कमतरता गुंतवणूकदारांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते. ShareIndia चे रवी सिंग म्हणाले की फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टॉकमध्ये नवीन तेजी येऊ शकते. सध्या शेअर 280 च्या पातळीच्या जवळ ट्रेड करत आहे आणि येत्या सेशनमध्ये यात अस्थिरता दिसू शकते परंतु 250 आणि 260 च्या पातळीवर देखील मजबूत सपोर्ट कायम आहे जो तुटण्याची शक्यता कमी आहे. म्हणून या काउंटरवर मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी चांगली रॅली दिसेल. सामान्यांना परवडणारं आहे का आजचं पेट्रोल? जाणून घ्या 1 लीटर इंधनाचे दर मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, फोर्टिस हेल्थकेअर शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीसाठी, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,19,50,000 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या भांडवलाच्या 4.23 टक्के आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: