मराठी बातम्या /बातम्या /मनी /

स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न महागणार? बिल्डर्स घरांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत

स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न महागणार? बिल्डर्स घरांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत

हवालानुसार कोविडपूर्व (Before Covid) म्हणजेच कोरोना महामारीपूर्वीच्या 2019 च्या तुलनेत बांधकाम खर्चात 19 ते 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्पांच्या किमती वाढवणे गरजेचे झाले आहे.

हवालानुसार कोविडपूर्व (Before Covid) म्हणजेच कोरोना महामारीपूर्वीच्या 2019 च्या तुलनेत बांधकाम खर्चात 19 ते 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्पांच्या किमती वाढवणे गरजेचे झाले आहे.

हवालानुसार कोविडपूर्व (Before Covid) म्हणजेच कोरोना महामारीपूर्वीच्या 2019 च्या तुलनेत बांधकाम खर्चात 19 ते 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्पांच्या किमती वाढवणे गरजेचे झाले आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 19 नोव्हेंबर : पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, फळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर आता घरेही महाग (Home Price will increase) होऊ शकतात. स्वस्त व्याजदर आणि सबसिडीमुळे घर खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी हा धक्का आहे. देशातील सर्व राज्ये आणि प्रमुख शहरांमधील 13,000 हून अधिक डेव्हलपर्स आणि बांधकाम व्यावसायिकांची (Builders) संघटना असलेल्या CREDAI भोपाळने शुक्रवारी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार कोविडपूर्व (Before Covid) म्हणजेच कोरोना महामारीपूर्वीच्या 2019 च्या तुलनेत बांधकाम खर्चात 19 ते 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्पांच्या किमती वाढवणे गरजेचे झाले आहे.

दरवाढीचे कारण काय?

हिरानंदानी ग्रुपचे (Hiranadani Group) एमडी निरंजन हिरानंदानी यांनी सांगितलं की, 2017 पासून रिअल इस्टेट क्षेत्र (Real Estate Sector) विविध समस्यांना तोंड देत आहे. कोविड 19 महामारीने संकट आणखी वाढवले. कच्चा माल आणि मजुरांच्या इनपुट कॉस्टमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हिरानंदानी यांच्या मते, विकासकांना घरांच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी वाढवाव्या लागू शकतात.

Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; ऑनलाईन औषधेही मागवता येणार

मालमत्ता सल्लागार समूह अॅनरॉकचे (ANAROCK) अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, इनपुट खर्चात प्रचंड वाढ होऊनही मागणी वाढवण्यासाठी विकासकांनी किमती शक्य तितक्या रोखून ठेवल्या. तथापि, वाढत्या महागाईच्या ट्रेंडमुळे हे स्पष्ट होते की उशिरा का होईना किमती वाढवाव्या लागतील. पुरी पुढे म्हणतात की बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ इतकी गंभीर आहे की खरेदीदारांवर परिणाम झाल्याशिवाय ती सहन करता येणार नाही.

नगर नियोजक आणि मालमत्ता तज्ज्ञ (Urban Planner and Property Expert) मनोज सिंग मीक म्हणाले की, डिझेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या किमती, कुशल आणि अर्ध-कुशल मजुरांचा तुटवडा, लॉकडाऊन, उच्च मार्गदर्शक तत्त्वे आणि स्टॅम्प ड्युटी आणि व्यापक प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे बांधकाम खर्चात वाढ सुमारे एक चतुर्थांश वाढ झाली आहे.

यशोगाथा: 27 व्या वर्षी 10 हजार कमावणारे विजय शेखर यांची आताची कमाई थक्क करणारी

सरकारने मदत केली तर दरवाढ थांबू शकते

क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया म्हणाले की, गेल्या एका वर्षात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. वाढत्या खर्चाचा भार विकासकांना सहन होत नाही. त्यामुळे दुर्दैवाने घर खरेदीदारांवर याचा बोजा पडू शकतो. क्रेडाई सरकार आणि संबंधित मंत्रालयांना या समस्येकडे लक्ष देण्याची आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर हाताळण्याची विनंती करते. भोपाळ क्रेडाईचे अध्यक्ष नितीन अग्रवाल म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये RERA मुळे किमती वाढवता येणार नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने या दिशेने पुढाकार घ्यावा ही विनंती.

First published:

Tags: Home Loan, Money