जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठांना मिळतील 'या' सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती

Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठांना मिळतील 'या' सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती

रेल्वेचे नियम

रेल्वेचे नियम

Indian Railway: भारतीय रेल्वे वरिष्ठ नागरिकांना यासोबतच गर्भवती महिलांना अतिरिक्त सुविधा देते. याविषयीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 एप्रिल: भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी महत्त्वाची पावलं उचलत असते. रेल्वे विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अतिरिक्त सुविधा पुरवते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मिळणाऱ्या सीट संबंधित सुविधांबाबत मोठी माहिती दिली.

News18लोकमत
News18लोकमत

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये विरिष्ठ नागरिकांना (60 वर्षांपेक्षा जास्त) कंफर्म लोअर बर्थ देण्यासाठी वेगळा नियम आहे. यासोबतच 45 वर्षांपेक्षा जास्त किंवा गर्भवती महिला प्रवाशांना न मागताच लोअर बर्थ दिली जाते. यासाठी प्रत्येक स्लीपर कोचमधील 6 लोअर बर्थ रिझर्व्ह असतात. यासोबतच थर्ड एसीमध्ये 4-5 आणि एसी 2 टियरमध्ये 2-3 लोअर बर्थ या लोकांसाठी रिझर्व्ह ठेवल्या जातात. जर एखाद्या कारणामुळे अशा लोकांना तिकिट बुक करताना अपर बर्थ मिळला तर तिकिट चेकिंग अधिकारी एखादं लोअर बर्थ रिकामं झाल्यावर त्यांना येथे शिफ्ट करु शकतात.

तिकीटावर सवलत

कोविड-19 पूर्वी रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत द्यायची. मात्र कोविड-19 दरम्यान ही सुविधा बंद झाली होती. ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की, रेल्वे प्रत्येक तिकिटावर ज्येष्ठ नागरिकांसह सर्व प्रवाशांना 57 टक्क्यांपर्यंत सूट देते. याशिवाय विद्यार्थी, दिव्यांग आणि रुग्णांना वेगळे अनुदान देते. सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षात तिकिटांवर 59837 कोटी रुपयांची सबसिडी दिली होती.

Dream11 सारखे गेम खेलणाऱ्यांनो लक्ष द्या! तुमच्यासाठी सरकारने आणला नवा नियम

कोविड-19 पूर्वी रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात 40 टक्क्यांपर्यंत सूट द्यायची. त्याच वेळी, महिलांना वयाच्या 58 व्या वर्षापासून 50 टक्के सूट मिळू लागते. कोविड-19 पूर्वी, आरक्षणासह प्रत्येक ट्रेनमध्ये ही सूट दिली जात होती. मात्र, आता हे केले जात नाही. भाड्यात सूट देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जातेय. भाजपचे खासदार राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट पुन्हा एकदा सुरू करावी, अशी शिफारस केली होती. गेल्या महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात ही शिफारस ठेवण्यात आली होती. यापूर्वीही समितीने अशी शिफारस केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात