मुंबई, 2 फेब्रुवारी : तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक (Railway Ticket online Booking) करता तेव्हा, रेल्वे तुम्हाला फक्त 35 पैशांमध्ये प्रवास विमा (Travel insurance) मिळवण्याचा पर्याय देते. या विम्यामुळे विमा कंपनी रेल्वे प्रवासातील नुकसान भरून काढते. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. यामध्ये अपघातातील वेगवेगळ्या पात्रतेनुसार प्रवाशाला विम्याची रक्कम दिली जाते. यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक कराल तेव्हा रेल्वे प्रवास विम्याचा पर्याय नक्कीच निवडा. जेव्हा तुम्ही विमा पर्याय निवडता, तेव्हा तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल. ही लिंक विमा कंपनीची आहे. या लिंकला भेट देऊन, तुम्ही तेथे नॉमिनी तपशील भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यासच विमा दावा उपलब्ध होतो. LIC IPO : 29 कोटी पॉलिसीधारक, 11 लाख एजंट्स; शेअर बाजाराची चमक वाढवू शकतो एलआयसी आयपीओ अपघात झाल्यास ही रक्कम दिली जाईल रेल्वे अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात मदत होते. रेल्वे अपघातात तुम्हाला किती नुकसान झाले आहे, त्यानुसार तुम्हाला विम्याची रक्कम मिळते. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची विमा रक्कम उपलब्ध आहे. रेल्वे प्रवासी अपघातात पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 10 लाख रुपये मिळतात. अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये, दुखापत झाल्यास 2 लाख रुपये रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या वाहतुकीसाठी विमा कंपनी 10 हजार रुपये देते. Business Idea: फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय; होईल लाखोंचा नफा, सरकारही करेल मदत क्लेमची प्रक्रिया रेल्वे अपघात झाल्यास, ती व्यक्ती, नॉमिनी किंवा त्याचा वारसदार विम्याचा क्लेम करू शकतात. यासाठी तो विमा कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन विमा क्लेम (Insurance Claim) करू शकतो. आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागतात. रेल्वे अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत विम्याचा क्लेम करता येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.