Home /News /money /

Business Idea: फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय; होईल लाखोंचा नफा, सरकारही करेल मदत

Business Idea: फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय; होईल लाखोंचा नफा, सरकारही करेल मदत

Business Idea: ब्युटी प्रॉडक्ट्ससह ( beauty products) खाद्यपदार्थांमध्येही ( food items) याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कारण त्यामधले औषधी आणि उपयुक्त गुणधर्म जवळपास सर्वांनाच माहिती आहेत.

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: भारतासह ( India) परदेशातही कोरफडीची ( aloevera) मागणी ( demand) खूप आहे. त्यामुळे कोरफडीची शेती केल्यानंतर यामधून भरपूर नफा ( profit) मिळू शकतो. गेल्या काही वर्षांत कोरफडीची मागणी झपाट्याने वाढली ( increased rapidly) आहे. ब्युटी प्रॉडक्ट्ससह ( beauty products) खाद्यपदार्थांमध्येही ( food items) याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कारण त्यामधले औषधी आणि उपयुक्त गुणधर्म जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. भारतात कोरफडीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक कंपन्या त्यापासून उत्पादनं बनवतात. देशातल्या लघुउद्योगांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत अनेक व्यवसाय कोरफडीपासून तयार केलेली उत्पादनं विकून करोडोंची कमाई करतात. कोरफडीची दिवसेंदिवस वाढत असलेली मागणी पाहता, तुम्हीही त्याची शेती करून लाखोंची कमाई करू शकता. असा करा व्यवसाय तुम्ही कोरफडीसंबंधीचा व्यवसाय दोन प्रकारे करू शकता. एक म्हणजे त्याची शेती करून आणि दुसरा म्हणजे त्यापासून ज्यूस किंवा पावडर तयार करण्याचा प्लांट उभारून. आज आम्ही तुम्हाला कोरफडीची शेती आणि प्रोसेसिंग प्लांटसाठी येणारा खर्च यासंबंधित काही माहिती देत आहोत. यामध्ये कमी खर्चात उत्पादन घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त नफा कमवता येईल. 50 हजारांची गुंतवणूक तुम्ही 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीत शेतामध्ये कोरफडीची लागवड करू शकता. उत्पादक कंपन्यांना आणि मंडईमध्ये ती विकू शकता. याशिवाय, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर तुम्ही कोरफडीचं प्रोसेसिंग युनिट सुरू करून भरपूर नफा कमावू शकता. प्रोसेसिंग प्लांटसाठी खर्च किती? तुम्ही कोरफड प्रोसेसिंग युनिट सुरू करून त्यापासून जेल, ज्यूस तयार करून ते विकून मोठी कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला 3 ते 5 लाख रुपये खर्च करावे लागतील. कोरफडीची शेती करायची असल्यास आवश्यक घटक, रोपं, खत, मजूर, कापणी, पॅकेजिंग इत्यादींवर खर्च करावा लागतो. देशाच्या अनेक भागांत कोरफडीचं रोप एकदा लावून 3 वर्षं उत्पादन घेतलं जातं, तर अनेक ठिकाणी 5 वर्षं पीक घेतलं जातं. मोठा नफा कोरफडीची शेती किंवा व्यवसाय तुम्ही सुमारे 50 ते 60 हजार रुपये गुंतवणूक करून सुरू करू शकता. त्यामधून 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत नफा कमावू शकता. कॉस्मेटिक्स, मेडिकल आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रात कोरफडीची मागणी खूप जास्त आहे. अ‍ॅलो व्हेरा ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शाम्पू यांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. कोरफडीचा वापर अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक आणि युनानी औषधांमध्ये केला जातो. कोरोना महामारीमध्ये नोकरी गेल्यामुळे अनेक जण शेतीच्या व्यवसायाकडे वळले आहेत. अशा वेळी तुम्हीही शेती करण्याचा विचार करत असाल, तर कोरफडीची शेती करणं हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थातच चांगलं मार्गदर्शन घेऊन आणि बाजारपेठेचा विचार करून मगच शेतीच्या व्यवसायात उतरणं श्रेयस्कर.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Business News, Money

पुढील बातम्या