जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Railway Knowledge:सर्व सीट बुक होऊनही वेटिंग तिकीट का? ट्रेन रिझर्वेशनचा फंडा काय?

Railway Knowledge:सर्व सीट बुक होऊनही वेटिंग तिकीट का? ट्रेन रिझर्वेशनचा फंडा काय?

रेल्वे तिकीट रिझर्वेशन

रेल्वे तिकीट रिझर्वेशन

Railway Knowledge: तुम्ही अनेकता रेल्वेचं तिकीट बुक करायला जाता. तेव्हा ते वेटिंगवर दिसतं. पण रेल्वेची तिकीट बुक झाल्यानंतर ती वेटिंगवर का ठेवली जातात. याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल: सुट्ट्या आणि सणांच्या काळात ट्रेनमध्ये प्रवास करणं कठीण असतं. कारण या गाड्यांचे सर्व तिकीट फूल झालेले असतात. ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणं अवघड होऊन बसतं. मग आपलं तिकीट वेटिंगवर जातं. अशा वेळी हे वेटिंग तिकीट काय आहे आणि त्याचे प्रकार काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही देखील भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर वेटिंग लिस्टविषयी तुम्हाला माहिती असेलच. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले नाही त्यांना वेटिंग लिस्टमध्ये टाकले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

तुमचं तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असण्याचा अर्थ असा आहे की, जर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशाने त्यांचा प्रवास रद्द केला तर तुम्हाला त्याची जागा दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुमचा प्रतीक्षा यादी क्रमांक 50 असेल, तर याचा अर्थ असा होईल की त्या ट्रेनमध्ये किमान 49 लोकांना त्यांची तिकिटे रद्द करावी लागतील, तर तुमचा नंबर कुठेतरी येऊ शकतो. नियमांनुसार तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. ट्रेन सुटण्याच्या वेळी हे तिकीट आपोआप रद्द होते.

वेटिंग लिस्टच्या वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता असते

WL- ज्यावेळी तुम्ही रेल्वे तिकीट बुक करता तेव्हा अनेक वेळा वेटिंग लिस्ट (WL) कोड लिहिलेला येतो. वेटिंग लिस्ट श्रेणीसाठी हा सर्वात सामान्य कोड आहे. RAC- आरएसी कोड म्हणजे रिझर्व्हेशन अगेंस्ट कँसिलेशन. RAC मध्ये एकाच बर्थवर दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. यामध्ये तिकीट कन्फर्म होण्याची दाट शक्यता असते.

ऊन पावसाचा सामना करुनही का गंजत नाहीत रेल्वे रुळ? कारण पाहून व्हाल चकीत

RLWL- रिमोट लोकेशन वेटिंग लिस्टमध्ये कन्फर्म होण्याची सर्वाधिक शक्यता असते. लहान स्टेशनच्या बर्थचा हा कोटा असतो. ही वेटिंग लिस्ट ट्रेनच्या सुरुवातीच्या आणि अखेरच्या स्टेशनदरम्यानच्या स्थानकांवरून जारी केली जाते. GNWL च्या तुलनेत अशा वेटिंग लिस्ट कन्फर्म होण्याची शक्यता कमी आहे कारण त्यासाठी कोणताही कोटा नाही परंतु सांगितलेल्या स्थानकांमधील कन्फर्म तिकीट झाल्यावर हे कन्फर्म केले जाऊ शकतात.

ट्रेन इंजिनच्या खाली असतो रेतीने भरलेला डब्बा, कारण जाणून व्हाल चकीत!

PQWL- याचा अर्थ पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट आहे. हे तिकीट ट्रेन रुटच्या मध्यभागी असलेल्या छोट्या स्थानकांवरून वेटिंग तिकीट घेतल्यावर उपलब्ध असतो. उदाहरणार्थ, तुम्ही दिल्ली ते पाटणा या ट्रेनमध्ये अलिगढ ते मिर्झापूरचे तिकीट घेतल्यास, तुम्हाला तेथे PQWL वेटिंग मिळेल. या वेटिंग तिकिटासाठीही कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे. TQWL- ही तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट आहे. जेव्हा तुम्ही तत्काळ तिकीट बुक करता आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळत नाही, तेव्हा रेल्वे अशा प्रकारचे वेटिंग तिकीट जारी करते. यासाठी रेल्वेकडे कोणताही कोटा नसल्यामुळे हे कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे. केवळ कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतरच TQWL वेटिंग तिकीट कन्फर्म केले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात