नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : अभिनेते राहुल बोस यांनी चंदिगडच्या हॉटेलने 2 केळ्यांना 442 रुपये बिल लावल्याचं ट्वीट केलं होतं. या ट्वीटवर खूपच चर्चा झाली. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईतल्या फोर सीझन्स या हॉटेलचा किस्साही ट्विटरवर आला. या हॉटेलने कार्तिक धर नावाच्या एका व्यक्तीला 2 उकडलेल्या अंड्यांसाठी 1700 रुपयांचं बिल लावलं होतं. या घटनांमुळे सामान्य माणसंच नाही तर श्रीमंत माणसांनीही फाइव्ह स्टार हॉटेलचा धसका घेतल्याचं समोर आलं. पण खाद्यपदार्थांवर अव्वाच्या सव्वा पैसे लावणाऱ्या हॉटेल्सवर सरकार कारवाई करणार आहे. अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनीच हे जाहीर केलं आहे.
A Twitter user named Kartik Dhar took to the platform to share that he had been charged 1700 bucks for two boiled eggs.https://t.co/f9jSynW7af
— News18 (@CNNnews18) August 11, 2019
केळी, अंडी अशा वस्तूंसाठी जादा पैसे लावले तर त्या हॉटेल्सना सरकारला जबाब द्यावा लागेल. ग्राहकांची लूट होऊ नये म्हणून ग्राहक संरक्षण कायद्यात नव्या कलमांचा समावेश केला जाणार आहे. केळी, अंडी अशा वस्तू बाजारात स्वस्तात उपलब्ध असताना फाइव्ह स्टार हॉटेल्स त्यावर जादा सेवाकर घेतात. ही खूपच गंभीर गोष्ट आहे,असंही रामविलास पासवान म्हणाले. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत यावर कायदा बनवला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘काश्मीरच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना अतिरेक्यांबद्दल तळमळ’- मोदी राहुल बोस आणि कार्तिक धर यांच्या ट्वीटनंतर आता पुन्हा कुणालाही असं ट्वीट करावं लागू नये, अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे. याविरोधात आवाज उठवल्यानंतर आता मनमानी पैसे लावणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई होणार आहे. ========================================================================================== VIDEO : ‘हिंदुस्तान झिंदाबाद है..’ सनी देओल यांचं ‘गद्दर स्टाईल’ भाषण