मुंबई, 22 डिसेंबर : मंगळवारी रिटेल चेन डी-मार्टचे प्रमोटर राधाकिशन एस दमाणी (Radhakishan S Damani) फॅमिलीने सांगितले की त्यांनी 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे इंडिया सिमेंट्समधील (India Cement share) 62 लाख शेअर्स किंवा 1.6 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्यामुळे त्यांची सिमेंट कंपनीतील भागीदारी 21.14 टक्क्यांवरून 22.76 टक्क्यांवर पोहोचली आहे. BSE शेअरहोल्डिंग डेटानुसार, दमाणी फॅमिलीचा इंडिया सिमेंट्समधील स्टेक सप्टेंबरच्या अखेरीस 21.14 टक्के होता. इंडिया सिमेंट दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे. चेन्नईच्या कंपनीने 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 21.97 कोटी रुपयांचा स्टँडअलोन प्रॉफिट नोंदवला होता. सिमेंट कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 71.43 कोटी रुपयांचा स्टँडअलोन प्रॉफिट कमावला होता. डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम? बुधवारी इंडिया सिमेंटचे शेअर्स 5.7 टक्क्यांच्या वाढीसह 186.75 रुपयांवर बंद झाले. शेअर आज सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह उघडला. गेल्या दोन दिवसांपासून त्यात वाढ सुरू असून यादरम्यान तो 9 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम? शेअर्समध्ये हाय वॉलिटॅलिटी मार्केट मोजो वेबसाइटनुसार, आज स्टॉकमध्ये 75 टक्के इंट्राडे वॉलिटॅलिटीसह हाय वॉलिटॅलिटी आहे. वेबसाइटनुसार, स्टॉकचे डिलिव्हरी व्हॉल्यूम 4.19 लाख होते, जे 5 दिवसांच्या अॅव्हरेज डिलिव्हरी व्हॉल्यूमपेक्षा 0.2 टक्क्यांनी जास्त होते. डिलिव्हरी व्हॉल्यूम हे स्टॉकच्या अॅनालिसिससाठी एक प्रभावी साधन मानले जाते. स्टॉकची डिलिव्हरी व्हॉल्यूम जास्त म्हणजे गुंतवणूकदारांचा त्यावर अधिक विश्वास असं मानलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







