सहारनपूर, 25 फेब्रुवारी : काळ सतत बदलत राहतो. आपण बदलत्या काळासोबत बदललो नाही तर उपयोग नसतो असं म्हटलं जातं. जो लवचिकपणे स्वतःला बदलतो तोच टिकून राहतो. उत्तर प्रदेशाच्या सहारनपूर (Uttar Pradesh Saharanpur) इथं राहणारे संजय अग्रवाल (Sanjay Agrawal) आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही ही गोष्ट खूप चांगली समजली होती.
जवळपास 14 वर्षांपूर्वी 2006 मध्ये संजय यांनी 10 बाय 20 किराणा दुकानाला 1500 स्वेअर फूट मोठं करायचं ठरवलं. मात्र या अपग्रेडनंतर त्यांच्या व्यवसायात काही मोठी तेजी आली नाही. त्यांचा मुलगा वैभव अग्रवालनं (Vaibhav Agrawal) पाहिलं, की वडिलांच्या इतक्या कष्टानंतरही त्यांना पुरेसा नफा मिळत नाही. त्यांचा व्यवसायही (business) वाढत नाही.
31 वर्षीय वैभवनं त्यांची मदत करायची ठरवलं. याशिवायही वैभव यांनी आज डझनभर शहरांतून 100 हून जास्त किराणा स्टोअर्सचा कायापालट केला आहे. आता वैभवनं आपली स्टार्टअप कंपनी - द किराना स्टोअर (The Kirana Store) सुरू केली आहे. मागच्या दोन वर्षात या स्टार्टअपमधून त्यांना जवळपास 5 कोटींचा महसूल मिळाला आहे.
वैभव सांगतो, की त्याचे वडील घरात कमवणारे एकटेच होते. आणि सहारनपूरमध्ये 'कमला स्टोअर' नावानं ते दुकान चालवायचे. 2013 मध्ये मी इंजिनियरिंग पूर्ण केलं. काही महिने वडिलांसोबत स्टोअरवर काम केलं. यानंतर कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून म्हैसूरमध्ये एका एमएनसीमध्ये (MNC Job) काम करायला लागलो.'
इथं रिटेल मार्केटमध्ये (Retail market) खरेदी करण्याचा अनुभव त्याच्यासाठी एकदम नवीन होता. इथं वैभवला स्मार्ट स्टोअर्सबाबत माहिती मिळाली. या स्टोअर्सचा प्रॉडक्ट मिक्स आणि चेन सिस्टम एकदमच वेगळी असल्याचं त्याला कळालं. त्यानं त्याचा चांगला अभ्यास केला. आपल्या वडिलांचं दुकान असंच स्मार्ट स्टोअर करायचं त्यानं ठरवलं.
एक वर्ष विचार करून त्यानं नोकरी सोडली. 2014 मध्ये तो एका रिटेल कंपनीत केवळ दहा हजार रुपयांच्या पगारावर मॅनेजर बनला. रिटेल मार्केटचं लॉजिस्टिक्स, प्रॉडक्ट मिक्स आणि इतरही गोष्टी त्यानं समजून घेतल्या. एका वर्षात या क्षेत्राचा खूप अभ्यास करून त्यानं हीसुद्धा नोकरी सोडली. सगळ्यात आधी वडिलांचं स्टोअर बदलायचं ठरवलं. 2018 पर्यंत त्यानं वडिलांच्या दुकानात खूप बदल केले. व्यवस्थापनासाठी एक खास सॉफ्टवेअरही तयार केलं. ग्राहकांची संख्या आणि नफा यातून वाढला.
अनेक लोकांमध्ये वैभवच्या या प्रयोगाची चर्चा सुरू झाली. एका व्यक्तीनं आपलंही दुकान असं बदलून देण्याचा आग्रह केला. वैभवनं आता आपल्या या प्रयोगाचं डिजिटल मार्केटिंग सुरू केलं. 2021 पर्यंत वैभवनं आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून 12 शहरांमधील जवळपास 100 किराणा दुकानांचा चेहरा बदलला. सोबतच वैभव नव्यानं सुरू होणाऱ्या स्टोअर्सलाही आधुनिक बनवण्यात मदत करतो.
हेही वाचा क्या बात है! मुलाच्या वडिलांनी नाकारले हुंड्यातले 11 लाख रुपये
वैभवच्या स्टार्टअपनं 2019-20 मध्ये तब्बल 1 कोटींचा नफा (1 crore profit) कमावला आहे. 2020-21 मध्ये हा नफा 5 कोटी असेल असा वैभवचा अंदाज आहे. वैभव सांगतो, की या व्यवसायातलं सर्वात अवघड काम असतं ग्राहकांना त्यांच्या स्टोअरमध्ये बदल करण्याची गरज का आहे ते पटवून देणं. हा बदलावं करण्यासाठी त्यांना भविष्यात मिळणारा नफा समजावून द्यावा लागतो. याशिवाय स्टोअरवर होणारा खर्चही समाजवून सांगावा लागतो. वैभवाच्या स्टार्टअपनं 7 लाखांपासून ते 30 लाखांपर्यंत अनेक स्टोअर्समध्ये असा बदल घडवला आहे. यात त्यांना 6 महिने ते 1 वर्ष इतका काळ लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Innovation, Money, Startup, Startup Success Story, Uttar pradesh