Home /News /national /

क्या बात है! मुलाच्या वडिलांनी नाकारले हुंड्यात मिळालेले 11 लाख रुपये

क्या बात है! मुलाच्या वडिलांनी नाकारले हुंड्यात मिळालेले 11 लाख रुपये

हुंड्याचा मोह कित्येक बड्या लोकांना टाळता येत नाही. अशावेळी एका सामान्य माणसानं मात्र आदर्श घालून दिला आहे.

     बुंदी, 24 फेब्रुवारी : हुंडाप्रथा (dowry system) भारतीय समाजात अजूनही टिकून आहे. कितीही कडक कायदे केले तरी लोक विविध मार्गांनी हुंडा घेणं थांबवत नाहीत. अशावेळी राजस्थानात (Rajasthan) घडलेली एक घटना मात्र दिलासा देणारी आहे. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. इथले एक निवृत्त प्राचार्य बृजमोहन मीणा (Retired principle Brujmohan Meena) यांनी टोंक जिल्ह्याच्या एका गावात आपल्या मुलाचा विवाह (marriage of son) ठरवला. मंगळवारी त्याची एंगेजमेंट (engagement) होती. यावेळी विधी सुरू असतानाच मुलीच्या वडिलांनी नोटांनी भरलेली मोठी थाळी समोर ठेवली. हे पाहून बृजमोहन लगेचच म्हणाले, की आम्हाला हे पैसे अजिबात नको. आम्हाला फक्त मुलगी पाहिजे. हे म्हणून हुंड्याच्या रूपात मिळणारे 11 लाख रुपये त्यांनी परत केले. लोकांनी म्हणालं, की हा तर रिवाज असतो तेव्हा त्यांनी केवळ 101 रुपये ठेऊन घेतले. बृजमोहन मीणा खजुरी ग्रामपंचायतीच्या पीपरवाला या गावात राहतात. त्यांचा मुलगा रामधन याचा साखरपुडा सोलतपुरा इथल्या आरती मीणासोबत ठरला. यादरम्यानच मुलीकडच्या पक्षानं (brides father) बृजमोहन यांना 11 लाख 101 रुपये देऊ केले. बृजमोहन यांनी मात्र यातील केवळ 101 रुपये घेतले. 11 लाख रुपये त्यांनी ठामपणे नाकारले. कार्यक्रमात आलेल्या अनेकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. यातून धडा घेतला पाहिजे असं अनेकजण बोलले. आपल्या होणाऱ्या सासऱ्याच्या या कृतीमुळं वधू आरती अतिशय भारावून गेली. आरती म्हणाली, की हुंड्यात मिळणारी रक्कम नाकारून माझ्या सासऱ्यांनी समाजाला मोठाच संदेश दिला आहे. यातून मुलींचा सन्मान वाढेल. हेही वाचा कचरा वेचणाऱ्या भावांचा Viral Video फक्त शेअर करून थांबले नाहीत आनंद महिंद्रा... आरती सध्या बी.एस्सी झाल्यावर बी.एड करते आहे. आरतीचे आजोबा प्रभू लाल मीणा म्हणाले, की बृजमोहनजींची ही कृती त्यांना महान बनवते. यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. या आणि आसपासच्या जिल्ह्यात अशी घटना आजवर पहिल्यांदाच घडली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, Rajasthan

    पुढील बातम्या