नवी दिल्ली, 12 मे: घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. मात्र काही आर्थिक अडचणी किंवा कमी बजेट यामुळे अनेकदा हे स्वप्न पूर्ण होत आहे. तुमच्या बाबतीतही असंच काहीसं झालं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील दुसरी मोठी बँक असणारी पंजाब नॅशन बँक (Punjab National Bank PNB) तुमच्यासाठी खास संधी घेऊन आली आहे. 12 मे रोजी तुम्ही रहिवासी तसंच व्यावसायिक प्रॉपर्टी ई-लिलावाच्या माध्यमातून स्वस्तात खरेदी करू शकता. पीएनबी ही संधी देत आहे. कोरोना काळात ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत आहे, त्यामुळे घरबसल्या तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. पंजाब नॅशनल बँकेने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे 2021 रोजी पंजाब नॅशनल बँकेकडून इ-लिलाव (PNB E-Auction) होणार आहे. या लिलावात सहभागी होण्याकरता तुम्हाला e-Bikray Portal असणाऱ्या https://ibapi.in/ या पेजला भेट द्यावी लागेल. याठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती देखील मिळेल. याठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
Participate for the best prices!
— Punjab National Bank (@pnbindia) May 11, 2021
Get residential and commercial property through PNB e-Auction being held on 12th May 2021.
To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10s1hyq pic.twitter.com/Rs6x4lg5Xk
किती आहे प्रॉपर्टी? पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार 10902 रेसिडेंशियल प्रॉपर्टी, 2469 कमर्शियल प्रॉपटी, 1241 इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, 70 अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी असणार आहे. यापैकी ज्या प्रॉपर्टीची खरेदी तुम्ही करणार आहात, त्याकरता तुम्हाला बोली लावता येईल. हे वाचा- खात्यासाठी निवडा तुमचा Lucky Number! ही बँक देतेय खास सुविधा डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव एखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. पंजाब नॅशनल बँकेकडूनही अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते.