पुणे, 1 जून : ब्रिटिशांनी भारतावर दीडशेपेक्षा अधिक वर्ष राज्य केले. त्याच इंग्लंडसह (England) संपूर्ण युरोपातील तब्बल 1 कोटी जणांना एका तरुणीने कर्ज दिले आहे. या तरुणीचे नाव आहे आर्या तावरे. इतकेच नव्हे महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे (Arya Taware) यांचे स्वप्न आता 10 कोटी व्यावसायिकांना कर्ज देण्याचे आहे. तसेच त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्या सांगतात. प्रभावशाली 30 व्यक्तींमध्ये फोर्ब्ज (Forbes) या जगप्रसिद्ध मासिकाने युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील 30 वर्षांखालील 30 प्रभावशाली व्यक्तिंचा समावेश केला आहे. त्यात पुण्याच्या आर्या तावरे यांचा समावेश करण्यात आला आहे. युरोपमधील 10 कोटी व्यावसायिकांना कर्ज देण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. तसेच त्यासाठी त्यांची टीम काम करत आहे, असेही त्या सांगतात. कोण आहे आर्या तावरे? आर्या तावरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामतीतील काटेवाडी हे आहे. त्यांचे सर्व शिक्षण हे पुण्यातील अभिनव आणि वळसे पाटील स्कुलमध्ये झाले. यानंतर त्यांनी सिम्बॉयसिसमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा भाऊ लंडनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. त्यामुळेच त्यांना लंडनमध्ये येण्याची संधी मिळाली. लंडनमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण लंडनचे सौंदर्य पाहून त्या लंडनच्या प्रेमातच पडल्या. तिथेच राहायची आणि तिथेच नोकरी करायची त्यांची इच्छा झाली. तसेच विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. इतकेच नव्हे तर भारतात परत आल्यानंतरही त्यांच्या डोक्यात ते विचार येत होते. यानंतर त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि लंडनमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. आर्या यांचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे छोट्या आणि मध्यम बांधकाम व्यावसायिकांसमोर येणाऱ्या आर्थिक समस्यांबद्दल त्यांना कल्पना होती. या सर्व गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. वडिलांसोबतच त्या या व्यवसायाचे बाळकडून मिळाले होते. हेही वाचा - ‘या’ सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त पैस खर्च करावे लागणार; किती खर्च वाढणार? आर्या यांना लंडनला गेल्यावर तेथील व्यावसायिकांच्या समस्यासुद्धा भारतातील व्यावसायिकांसारख्या जाणवल्या. यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी येथील व्यावसायिकांना कर्ज, अर्थसहाय्य करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्वत:ची एक कंपनी काढली. लंडनमध्ये शिक्षण घेत असतानाच वयाच्या बाविसाव्या वर्षी आर्या तावरे यांनी तिथे स्टार्टअप सुरू केला. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत तब्बल 1 कोटी गोऱ्या साहेबांना कर्ज दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.