मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त पैस खर्च करावे लागणार; किती खर्च वाढणार?

'या' सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त पैस खर्च करावे लागणार; किती खर्च वाढणार?

देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विम्याची सुविधा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील 5 वर्षांत PMJJBY ची व्याप्ती 6.4 कोटींवरून वाढवून ती 15 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

मुंबई, 1 जून : आपल्यानंतर आपल्या जिवलगांसाठी विम्याचं संरक्षण (Insurance Cover) अत्यंत आवश्यक असतं. केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना राबवण्यात येते. या योजनेला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता याच विमा योजनेबद्दलची एक महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) या दोन्ही योजनांचा प्रीमियम वाढवण्यात आला आहे. याबद्दलची माहिती देणारं वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलं आहे.

प्रधानमंत्री विमा योजनेच्या हप्त्याचे नवीन दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत. PMJJBY चा प्रीमियम 32 टक्के वाढवण्यात आला आहे, तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम 67 टक्के वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या क्लेम्सच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत PMJJBY च्या अंतर्गत 6.4 कोटी अ‍ॅक्टिव्ह युझर्स होते, तर PMSBY योजनेअंतर्गत 22 कोटी सक्रिय ग्राहक होते.

या विमा योजना अधिकाधिक व्यावहारिक बनवण्यासाठी म्हणून प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. PMJJBY साठी आता हा प्रीमियम वाढवून प्रति दिन 1.25 रुपये इतका करण्यात आला आहे. तुम्हाला PMJJBY या योजनेत सहभागी व्हायचं असेल, तर आता तुम्हाला वार्षिक प्रीमियम 330 रुपयांऐवजी 436 रुपये इतका भरावा लागेल. पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेसाठी (PMSBY) वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून वाढवून 20 रुपये इतका करण्यात आला आहे.

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) सुरुवातीपासून 31 मार्च 2022 पर्यंत प्रीमियमच्या माध्यमातून 1134 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आणि 2513 कोटींच्या दाव्यांची परतफेड करण्यात आली. पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत (PMJJBY) 9737 कोटी रुपयांचा प्रीमियम जमा झाला, तर 14144 कोटी रुपयांच्या दाव्यांची परतफेड करण्यात आली.

देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विम्याची सुविधा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील 5 वर्षांत PMJJBY ची व्याप्ती 6.4 कोटींवरून वाढवून ती 15 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

New Rule: आजपासून बदलणारे 'हे' 10 नियम तपासा, थेट तुमच्या खर्चावर होणार परिणाम

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY) सध्या 22 कोटी ग्राहक आहेत. हे लक्ष्य पुढच्या 5 वर्षांत 37 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं ठरवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत (PMJJBY) बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचं सेव्हिंग्ज अकाउंट आहे अशा 18 ते 50 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा जर कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर कुटुंबीयांना 200000 रुपयांचं विमा संरक्षण मिळतं. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY) 18 ते 70 वर्षांच्या नागरिकांना अपघातात किंवा मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आल्यास 100000 रुपये विमा संरक्षण दिलं जातं.

First published:

Tags: Inflation, Insurance, Modi government, Narendra modi