Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

टाकाऊ पासून टिकाऊ! पुण्याच्या तरुणाच्या इको-फ्रेंडली उत्पादनांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद

टाकाऊ पासून टिकाऊ! पुण्याच्या तरुणाच्या इको-फ्रेंडली उत्पादनांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद

प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणं. पुण्यात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणाने असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. तो देशभरात इको-फ्रेंडली ( eco-friendly) उत्पादनांचं मार्केटिंग करत आहे.

प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणं. पुण्यात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणाने असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. तो देशभरात इको-फ्रेंडली ( eco-friendly) उत्पादनांचं मार्केटिंग करत आहे.

प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणं. पुण्यात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणाने असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. तो देशभरात इको-फ्रेंडली ( eco-friendly) उत्पादनांचं मार्केटिंग करत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 डिसेंबर : आधी समस्या उभी राहू द्यायची आणि मग उपाय शोधत फिरायचे, हा जणू आपल्या व्यवस्थापनाचा ( management) अविभाज्य भाग बनला आहे. विशेषत: पर्यावरणीय समस्यांमध्ये ( environmental issues) तर ही बाब प्रकर्षाने दिसते. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान यावर नेहमी चर्चा केली जाते. परंतु आजही प्लास्टिक कचऱ्याची (Plastic waste) समस्या सुटली नाही. पुण्याच्या एका युवकाने असा व्यवसाय सुरू केला आहे, ज्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या सुटण्यास थोड्याफार प्रमाणात मदत होत आहे. त्याने पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. 'दैनिक भास्कर'ने त्याची यशोगाथा प्रसिद्ध केली आहे.

प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे आपल्या आरोग्याबरोबरच ( health) पर्यावरणालाही खूप हानी पोहोचते. गेल्या काही वर्षांत प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती ( environment Awareness) वाढली आहे. सरकारबरोबरच स्टार्टअप आणि वैयक्तिक पातळीवरही प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे; पण तरीही त्याची गती मंद आहे. देशातल्या केवळ एक चतुर्थांश प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. यावरून ही समस्या सोडवण्याचं आव्हान किती मोठं आहे, हे समजू शकते. प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणं. पुण्यात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणाने असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. तो देशभरात इको-फ्रेंडली ( eco-friendly) उत्पादनांचं मार्केटिंग करत आहे. दर महिन्याला त्याला 250 ते 300 ऑर्डर मिळत आहेत. त्याच्या कंपनीची उलाढाल 10 लाख रुपये आहे. सूरज सैद असं या तरुणाचं नाव असून तो मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. त्याने 2015 मध्ये इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स केलं आणि 2017 साली यूकेमधून बिझनेस मॅनेजमेंट केलं.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

यूकेमधून परतल्यानंतर सूरजने भारतातल्या कचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या एका कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली. सुमारे वर्षभर त्याने या कंपनीत काम केलं. यादरम्यान तो अनेक शहरांमध्ये कामानिमित्त गेला आणि कचरा व्यवस्थापनाबाबत त्याला बरंच काही शिकायला मिळालं. प्लास्टिक कचरा हे आपल्या सर्वांसाठी मोठं आव्हान असल्याचे सूरज म्हणतो. 'याबाबत पुस्तक आणि शोधनिबंधांमध्ये वाचलं होतं; पण खरी परिस्थिती काय आहे, ते प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर काम करताना कळलं. क्वचितच असं एखादं शहर असेल, जिथे कचऱ्याचे ढीग साचलेले नसतील,' असंही त्याने सांगितलं.

वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरताना लोकांमध्ये जागरूकता नसणं हेदेखील कचरा वाढण्यामागे एक मोठं कारण असल्याचं लक्षात आलं. नागरिक चहाचे कप, प्लास्टिकच्या प्लेट्स किंवा पॅकेट्स, रॅपर्स रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकतात. बहुतांश दुकानांमध्ये डस्टबिनही नाहीत. त्यामुळे हा कचरा इकडे तिकडे तसाच पडून राहतो किंवा नाल्यांद्वारे नदी किंवा तलावात मिसळतो. त्यामुळे जल प्रदूषण वाढतं, असं सूरजने सांगितलं. नागरिकांना जागरूक केल्याशिवाय हा त्रास कमी करणं शक्य नाही, हे लक्षात आल्यामुळे सूरज आणि त्याचे मित्र मिळून वेगवेगळ्या शहरात प्लास्टिकबाबत जनजागृती करू लागले. त्यासाठी त्यांनी एक टीमही तयार केली. सोशल मीडियावर ग्रुप तयार करून व्हिडीओ-फोटो शेअर करूनही त्यांनी जनजागृती केली.

दैनंदिन जीवनात वापरली जाणारी उत्पादनं इको-फ्रेंडली स्वरूपापत उपलब्ध करून द्यावीत, असं जनजागृती करत असताना सूरजला अनेक जणांनी सुचवलं. त्याला ही सूचना आवडली. व्यावसायिक स्तरावर हे काम केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, पर्यावरणपूरक उत्पादनांना मागणी आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने हा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला.

त्यासाठी सूरज आणि त्याच्या मित्रांनी अशा टाकाऊ वस्तूंची यादी तयार करण्यास सुरुवात केली, ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर असतो. त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये मार्केट अॅनालिसिस आणि रिसर्चनंतर सूरजने EcoBuddy नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी पर्यावरणास अनुकूल उत्पादनं बनवणाऱ्या काही स्थानिक कारागिरांशी करार केला. त्यानंतर सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्या उत्पादनांचं मार्केटिंग सुरू केलं. बांबू ब्रश, टंग क्लीनर, कापडी पिशव्या यांसारख्या उत्पादनांचं मार्केटिंग सुरू केलं. पहिल्या महिन्यातच सूरज व त्याच्या टीमचा प्रयत्न यशस्वी झाला. पहिल्या वर्षी त्यांचा सुमारे 15 लाख रुपयांचा व्यवसाय झाला.

Paytm ला पहिल्यांदा एखाद्या ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईज किती?

सध्या सूरज बांबू टूथ ब्रश, टंग क्लीनर, कापडी पिशव्या, कॉफी मग यांसह डझनभर इको-फ्रेंडली उत्पादनांचं उत्पादन आणि ऑनलाइन विक्री करत आहे. त्याच्याकडे स्वतःचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नाही. फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसह डझनभर प्लॅटफॉर्मवरून तो त्याच्या उत्पादनांचं मार्केटिंग आणि विक्री करत आहे. या उत्पादनांसाठी त्याने जवळपास 7 कारागिरांच्या गटाशी करार केले आहेत. त्यामध्ये 2 हजारांहून अधिक कारागीर काम करतात. या स्टार्टअपच्या माध्यमातून त्याची चांगली कमाई होत आहे. ऑनलाइन मार्केटिंगसोबतच सूरज सार्वजनिक ठिकाणी स्टॉल लावून लोकांना त्याच्या उत्पादनाची माहिती देतो.

सूरज म्हणाला, 'सध्या आमच्याकडे जी काही उत्पादनं आहेत, ती आम्ही स्वतः बनवण्याऐवजी आउटसोर्स करतो. देशाच्या विविध राज्यांतल्या स्थानिक कारागिरांशी आमचा करार झाला आहे. ते आमच्या मागणीनुसार आमच्यासाठी उत्पादनं बनवतात. यामध्ये दक्षिण, उत्तर, पूर्वेकडच्या राज्यांतल्या कारागिरांचा समावेश आहे. त्यानंतर आम्ही सर्व उत्पादनं एका ठिकाणी आणतो. तेथे त्यांची गुणवत्ता तपासून, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची डिलिव्हरी केली जाते.'

कोरोनाचा फटका इतर व्यवसायांप्रमाणे सूरजच्या व्यवसायालादेखील मोठ्या प्रमाणात बसला; पण आता त्याचा व्यवसाय पुन्हा रुळावर आला आहे. उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्याला दर महिन्याला 250 ते 300 ऑर्डर मिळत आहेत. कोरोना काळात व्यवसायाला फटका बसला असला, तरी या काळात त्याने जनजागृती मोहीम सुरू ठेवली होती. प्लास्टिकचा कचरा ही सर्वांत मोठी समस्याआहे. इको-फ्रेंडली व्यवसायांमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होत आहे.

First published:

Tags: Eco friendly, Environment