जाहिरात
मराठी बातम्या / मनी / MHADA Lottery 2023 : पुणेकर म्हाडासाठी अर्ज केला असेल तर या तारखा आहेत महत्त्वाच्या, चुकवू नका नाहीतर...

MHADA Lottery 2023 : पुणेकर म्हाडासाठी अर्ज केला असेल तर या तारखा आहेत महत्त्वाच्या, चुकवू नका नाहीतर...

MHADA Lottery

MHADA Lottery

MHADA Lottery 2023 : म्हाडासाठी अर्ज करताय मग या तारखा चुकवू नका, नाहीतर बसेल मोठा फटका

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी म्हाडाने तिन्ही उत्पन्न गटासाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी अर्ज भरण्याच्या आणि रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हाडाने यंदाच्या लॉटरीसाठी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यावेळी मानवी हस्तक्षेप कमी व्हावा आणि सगळी प्रक्रिया ही कंम्पुटरबेस असावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पुण्यात 5 हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी निघाली आहे. त्यापैकी 2 हजारहून अधिक घरं ही पहिल्यांदा येणार त्याला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही या तारखा अजिबात चुकवू नका. याशिवाय मुंबई आणि नागपूरमधील घरांसाठी निघणाऱ्या लॉटरीसाठी जे अर्ज करणार आहेत त्यांनी देखील या तारखा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 5-6 जानेवारीपासून म्हाडाच्या housing mhada gov in या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे. या साईटवर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर 7 डॉक्युमेंट जी लॉटरीसाठी आवश्यक आहेत, ती जमा करायची आहे. त्यानंतर अर्ज भरुन झाला की पेमेंट करायचं आहे.

Mhada Lottery 2023 : म्हाडाने बदलले नियम, घरासाठी अर्ज करण्याआधी वाचाच नाहीतर….

यंदाच्या लॉटरीमध्ये काय वेगळं? 300 ते 600 चौरस फूटांपर्यंत ही घरं आहेत. म्हाडाकडून वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. जी सिस्टिमद्वारे असेल. यामध्ये मानवी हस्तक्षेप कुठेही होणार नाही. याशिवाय नागपूर महानगर आणि मुंबईसाठी देखील म्हाडाने लॉटरीच्या सूचना काढल्या आहेत. यासंदर्भातील अधिक माहिती म्हाडाच्या साईटवर देखील तुम्हाला मिळणार आहे. कोणती कागदपत्र लागणार? अर्ज करणाऱ्यांसाठी तुमचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, 15 वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा आणि कोट्यातून घर घेत असाल तर त्यासंबंधित कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पुढची प्रक्रिया केली जाईल.

Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा आणि घर घ्या

कोणत्या तारखा महत्त्वाच्या? तुम्ही पुणे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही या तारखा अजिबात चुकवू नका. कारण या तारखा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या तारखा कोणत्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. 6 जानेवारी- रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्यासाठी सुरुवात 7 जानेवारी- पेमेंटची सुरुवात 5 फेब्रुवारी - अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 6 फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस

Mhada Lottery 2023 : म्हाडात घर घ्यायचं, मग यातलं एकही Document चुकवू नका, नाहीतर…
News18लोकमत
News18लोकमत

6 फेब्रुवारी- NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस 13 फेब्रुवारी - ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश 15 फेब्रुवारी- फायनल अॅप्लिकेशन 17 फेब्रुवारी - लॉटरी ड्रॉ 20 फेब्रुवारी - रिफंड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात