मुंबई : म्हाडासाठी रजिस्ट्रेशनला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला हवं. त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत. हे जाणून घेऊया. जर यातलं एक जरी कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कागदपत्रांची आताच जुळवाजुळव करा.
ओळखपत्र पुरावा- तुमच्याकडी एक ओळखपत्र, यामध्ये जर आधारकार्ड असेल तर त्यावर तुम्ही आता राहात असलेला पत्ता टाकणं आवश्यक आहे.
उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखल तुमचं बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लीप या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत.
जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही जर कोट्यातून अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या कोटासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे.
यासोबत स्वघोषणात्र देखील जोडावं लागेल.याआधी जर तुमच्या नावावर घर नसेल तर तुम्ही पीएम आवास योजनेचा लाभ घेऊ शकता