जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PPF vs FD: पीपीएफ की एफडी कुठे मिळतं जास्त रिटर्न? समजून घ्या पूर्ण कॅल्क्युलेशन

PPF vs FD: पीपीएफ की एफडी कुठे मिळतं जास्त रिटर्न? समजून घ्या पूर्ण कॅल्क्युलेशन

पीपीएफ बेस्ट की एफडी? घ्या जाणून

पीपीएफ बेस्ट की एफडी? घ्या जाणून

PPF vs FD Scheme: तुम्ही पीपीएफ किंवा एफडी स्किममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर यापैकी कोणती स्किम बेस्ट याविषयी आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

PPF vs FD Scheme: पैसे कमावण्यासोबतच त्याची योग्य जागेवर गुंतवणूक करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. सामान्यतः मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण आजही अनेक असे लोक आहेत जे गुंतवणुकीसाठी सरकारी स्किम किंवा बँक एफडीवर विश्वास ठेवतात. तुम्हीही सरकारच्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड स्किम किंवा एफडी स्किममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला यापैकी कोणता ऑप्शन बेस्ट हे सांगणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

महत्त्वाचं म्हणजे दोन्ही योजना मार्केट जोखिमपासून खूप दूर आहेत. देशातील वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांत सातत्याने व्याजदरात वाढ केली आहे. यानंतर अनेक बँका दीर्घ मुदतीसाठी ग्राहकांना 8 ते 9 टक्के व्याजदर देत आहेत. अशा परिस्थितीत एफडी किंवा पीपीएफमधून कोणती योजना बेस्ट असा प्रश्न उपस्थित होतो. कोणत्या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर जास्त रिटर्न मिळेल हे जाणून घेऊया. Fixed Deposit: गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी! 2 वर्षांच्या एफडीवर या 5 बँका देताय जबरदस्त लोन पब्लिक प्रोव्हिडेंट फंड स्किमविषयी घ्या जाणून पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ही सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या लहान बचत योजनांपैकी एक आहे. या योजनेचे सरकार दर तिमाहीला व्याजदर निश्चित करते. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही नोकरी नसतानाही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता आणि किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही योजनेचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के व्याज मिळतेय. जमा केलेल्या रकमेवर मिळणारे व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री असते. यासह, योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वजावट उपलब्ध आहे. ITR मुळे फक्त रिफंड मिळत नाही तर होतात ‘हे’ फायदे! एकदा अवश्य घ्या जाणून एफडी स्कीम - देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी देशातील अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.00 टक्के ते 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, अमृत कलश योजनेअंतर्गत, बँक 7.10 टक्के आणि 7.60 टक्के व्याजदर देत आहे. तर, एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3.00% ते 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याजदर देत आहे. पीपीएफ Vs एफडी स्किम - व्याजदरांविषयी बोलायचे झाले तर पीपीएफ स्किममध्ये कंपाउंडिंगच्या आधारावर रिटर्न मिळते. तर फिक्स्ड डिपॉझिट स्किममध्ये सामान्य किंवा कंपाउंडिंग दोन्हीमधून कोणत्याही पध्दतीचा व्याजदर ऑफर केलं जाऊ शकतं. तुम्ही कमी कालावधीसाठी गुंतवणुकीचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी एफडी बेस्ट आहे. तसंच दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ स्किम एक चांगला ऑप्शन ठरु शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात