Home /News /money /

PPF Calculator : सुरक्षित गुंतवणूक करुन बना करोडपती; दरमाह किती गुंतवणूक करावी लागेल?

PPF Calculator : सुरक्षित गुंतवणूक करुन बना करोडपती; दरमाह किती गुंतवणूक करावी लागेल?

पीपीएफ खात्यात दररोज 250 रुपये टाकल्यास ही रक्कम एका महिन्यात 7500 रुपये होते. अशा प्रकारे, एका वर्षात ही रक्कम 90,000 रुपयांपर्यंत पोहोचते. जर तुम्ही PPF खात्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर या कालावधीपर्यंत तुमच्याकडे 22.50 लाख रुपये जमा झाले असतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 जानेवारी : सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment Options) उपलब्ध आहेत. मात्र गुंतवणुकीदरम्यान उत्तम रिटर्न आणि पैशांची सुरक्षितता (Money Securities) या गोष्टी गुंतवणूकदारांसाठी प्राधान्य असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Long Term Investment) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हा एक चांगला पर्याय आहे. पगारदार लोकांसाठी, 15 वर्षांच्या मॅच्युरिटीचे पीपीएफ खाते भविष्यातील निधी उभारण्याचा एक चांगला मार्ग मानला जातो. या खात्याची खास गोष्ट म्हणजे यात मॅच्युरिटी (PPF Maturity) नंतरही 5-5 वर्षांसाठी वाढवता येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही वयाच्या 30 ते 35 व्या वर्षीही या योजनेत सामील झालात तर केवळ 25 वर्षांत तुम्ही पीपीएफद्वारे करोडपती होऊ शकता. 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला निधीची गरज नसेल, तर तो आणखी वाढवावा, असा सल्लाही वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. विशेष म्हणजे तुम्ही पीपीएफ खात्यातूनही कर सवलतीचा (Tax Rebate) लाभ घेऊ शकता. यामध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी उत्पन्न देखील करमुक्त आहे. Investment Options : यावर्षी 'या' तीन पद्धतीने चांगले पैसे कमवले जाऊ शकतात; चेक करा गुंतवणुकीचे पर्याय पीपीएफचा लाभ कसा मिळवायचा? PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. या खात्यावर 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने व्याज मिळत आहे. यामध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. या संदर्भात, 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर, तुम्ही कमाल 62 लाख रुपयांचा निधी (PPF maturity Benefits) तयार करू शकता. पीपीएफ कॅल्क्युलेटर (PPF Calculator) तुम्ही पीपीएफ खात्यात दररोज 250 रुपये टाकल्यास ही रक्कम एका महिन्यात 7500 रुपये होते. अशा प्रकारे, एका वर्षात ही रक्कम 90,000 रुपयांपर्यंत पोहोचते. जर तुम्ही PPF खात्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर या कालावधीपर्यंत तुमच्याकडे 22.50 लाख रुपये जमा झाले असतील. यासह, 25 वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला 61,84,809 रुपयांची मोठी रक्कम मिळेल. यामध्ये 39,34,809 रुपये व्याज आहे. कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न पीपीएफ खात्यात गुंतवणुकीची मर्यादा 1.50 लाखांपर्यंत पीपीएफ खात्यात, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही जास्तीत जास्त गुंतवणूक 12 हप्त्यांमध्येही करता येते. यामध्ये किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावाने पीपीएफ खाते सुरू करता येते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, PPF

    पुढील बातम्या