जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सरकारी योजनेत पैसे गुंतवून बना करोडपती! किती आणि कशी करावी लागेल गुंतवणूक; योजनेबद्दल वाचा सविस्तर

सरकारी योजनेत पैसे गुंतवून बना करोडपती! किती आणि कशी करावी लागेल गुंतवणूक; योजनेबद्दल वाचा सविस्तर

सरकारी योजनेत पैसे गुंतवून बना करोडपती! किती आणि कशी करावी लागेल गुंतवणूक; योजनेबद्दल वाचा सविस्तर

इतर बचत योजनांच्या तुलनेत पीपीएफवर जास्त व्याज (PPF interest) मिळतं. पीपीएफचा व्याजदर प्रत्येक तिमाहीला बदलला जातो. मात्र, लाँग टर्म गुंतवणूक असल्यामुळे या बदलामुळे तुमचे नुकसान होत नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 5 मे : भविष्यात पैशांची सोय व्हावी यासाठी जर तुम्ही लाँग टर्म गुंतवणूक (Best Long term investment) करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही आज तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबाबत (Best government investment scheme) माहिती देणार आहोत, ज्यामध्ये पैसे बुडण्याचा धोका अगदी शून्य आहे, शिवाय परतावा मिळण्याची गॅरंटीही 100 टक्के आहे. ही योजना तुम्हाला काही वर्षांमध्येच करोडपती बनवू शकते! या योजनेचं नाव आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्हणजेच PPF. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असणारी ही स्कीम (PPF Scheme) दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अगदी बेस्ट आहे. विशेष म्हणजे या स्कीमवर इतर बचत योजनांच्या तुलनेत अधिक व्याज (PPF interest rate) मिळते. तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपले पीपीएफ अकाउंट (How to open PPF account) सुरू करू शकता. या अकाउंटचे कायकाय फायदे आहेत, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. RBI च्या रेपो दरवाढीचा होम लोन घेणार्‍यांवर काय परिणाम होईल? EMI, कालावधी किती वाढेल? चेक करा इतर योजनांच्या तुलनेत जास्त व्याज इतर बचत योजनांच्या तुलनेत पीपीएफवर जास्त व्याज (PPF interest) मिळतं. पीपीएफचा व्याजदर प्रत्येक तिमाहीला बदलला जातो. मात्र, लाँग टर्म गुंतवणूक असल्यामुळे या बदलामुळे तुमचे नुकसान होत नाही. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज दिलं जात आहे, जे कोणत्याही बँकेच्या एफडीपेक्षा अधिक आहे. परताव्याची गॅरंटी इक्विटीप्रमाणे पीपीएफमध्ये मिळणारा परतावा हा मार्केटशी जोडलेला नसतो. त्यामुळे मार्केटमध्ये उलथापालथ झाली, तरी तुमचे पैसे बुडत नाहीत. तुम्हाला ठरलेल्या व्याजाप्रमाणेच रिटर्न (Return guarantee in PPF) मिळतात. ही पोस्ट ऑफिसची योजना असल्यामुळे एका प्रकारे तुमचे पैसे यात 100 टक्के सुरक्षित राहतात. रिझर्व्ह बँकेचा क्रेडिट-डेबिट कार्ड ग्राहकांना मोठा दिलासा; बँकांची मनमानी रोखण्यासाठी नवी नियमावली मॅच्युरिटीच्या वेळी किती मिळणार रक्कम? तुम्ही अगदी 100 रुपयांपासूनही पीपीएफ सुरू करू शकता. तसंच, एका वर्षात तुम्ही पीपीएफ खात्यात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये (PPF limit) भरू शकता. सध्याचे कम्पाउंडिंग व्याजदर 7.1 टक्के आहेत. जर तुम्ही दर वर्षी 1.50 लाख रुपये जमा केले, तर या व्याजदराने 15 वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम 40,68,209 रुपये होईल. यामध्ये तुम्ही जमा केलेली रक्कम 22,50,000 रुपये असेल. तर, तुम्हाला मिळालेले व्याज 18,18,209 रुपये असेल. असे व्हाल करोडपती एक कोटी रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला ही योजना 15 वर्षांच्या कालावधीनंतरही सुरू ठेवावी लागेल. 7.1 टक्के व्याजदर असताना वर्षाला 1.50 लाख रुपये जमा केल्यास, 25 वर्षांनंतर तुमच्या खात्यामध्ये 1.03 कोटी रुपये जमा होतील. यामधील तुमची गुंतवणूक 37,50,000 रुपये असेल. तर, तुम्हाला मिळालेले व्याज हे 65,58,015 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही काही वर्षांमध्येच अगदी सुरक्षितपणे करोडपती होऊ शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात