>> आदिल शेट्टी, सीईओ, Bankbazaar.com महागाईमध्ये (Inflation) सातत्यानं वाढ होत आहे. जेव्हा महागाई वाढते तेव्हा व्याजदरही (Interest Rates) वाढतात. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) व्याज दरांत वाढ होणं हे अपेक्षितच होतं. मात्र, तरीही आरबीआयचं 40 बेसिस पॉईंट्सनं (BPS) की रेट्स (Key Rates) वाढवण्याचं धोरण अनपेक्षित ठरलं. मध्यवर्ती बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं (MPC) एका आपत्कालीन बैठकीनंतर सर्वानुमते रेट्समध्ये वाढ करण्यासाठी मतदान केलं आहे. हाय लिक्विडिटी (High Liquidity), इंधन व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि सरकारी कर्जातील वाढ या कारणांमुळे जगभरात महागाई वाढत आहे. भारतातही सुरक्षित आणि असुरक्षित अशा सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये दर वाढ जाणवणार आहे. बेसिक पॉईंट्समध्ये झालेल्या वाढीचा होम लोन घेणाऱ्यांवर काय परिणाम होईल? बहुतेक बँकांनी त्यांचे कर्जदर आरबीआयच्या रेपो रेटनुसार (Repo Rate) ठरवलेले आहेत. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, जवळपास 40 टक्के होम लोन हे रेपो रेटसारख्या एक्सटर्नल बेंचमार्कशी (External Benchmark) निगडित आहेत. परिणामी, रेपो रेटमधील वाढीमुळे नवीन आणि विद्यमान कर्जदारांसाठी फार कमी वेळात कर्ज महाग होईल. रेपो दरातील कोणताही बदल तुमच्या कर्जाच्या दरांमध्ये (Loan Rate) बदल घडवून आणेल. याशिवाय, त्याचा तुमच्या कर्जाच्या कालावधीवरही (Loan Duration) परिणाम होईल. अशा परिस्थितीत जर तुमचं कर्ज फेडायला पुरेसा अवधी तुमच्या हातात राहिला असेल तर तुम्हाला दीर्घकाळासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. रिझर्व्ह बँकेचा क्रेडिट-डेबिट कार्ड ग्राहकांना मोठा दिलासा; बँकांची मनमानी रोखण्यासाठी नवी नियमावली उदाहरणार्थ, तुमचा ईएमआय (EMI) आणि व्याजाची जावक (Outgo) रक्कम अनुक्रमे 38 हजार 765 आणि 43.03 लाख असेल. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही 7 टक्के व्याजदरानं 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपये होम लोन घेतलेलं असेल. आता समजा होम लोनचे व्याजदर 7.4 टक्क्यांवर गेले तर तुमचा सुधारित ईएमआय आणि व्याजाची जावक रक्कम अनुक्रमे 39 हजार 974 आणि 45.93 लाख रुपये इतकी होईल. शिवाय लोनच्या कालावधीमध्ये अंदाजे 18 महिन्यांची वाढ होईल. LIC IPO साठी खास मोठा निर्णय; ‘या’ दिवशीही गुंतवणूकदारांना लावता येणार बोली ज्या कर्जदारांनी एमसीएलआर-लिंक्ड लोन (MCLR-linked Loans) घेतलेलं आहे त्यांनाही या दरवाढीचं प्रेशर जाणवू शकतं. बर्याच प्रमुख बँकांनी अलीकडेच त्यांच्या एमसीएलआर दरांमध्ये वाढ करून कर्ज महाग केली आहेत. कर्जदार काय करू शकतो? तुमचा ईएमआय आउटगो कमी करण्यासाठी तुम्ही प्रीपेमेंटची (Prepayments) निवड करू शकता. तुम्ही दरवर्षी तुमच्या थकबाकीपैकी पाच टक्के रकमेचं प्रीपेमेंट करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण, जर तुम्हाला हे परवडत नसेल, तर वर्षाला ईएमआयच्या एका हप्त्याचंही प्री-पेमेंट करू शकता. हेदेखील तुमच्या फायद्याचं ठरेल. होमलोनची परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर कमी दरात कर्ज देणारा कर्जदाता तुम्ही शोधू शकता. कमी दरांत कर्ज देणाऱ्या संस्थेकडे स्विच करून तुम्ही किती बचत करू शकता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वत:चं गणित मांडावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.