मुंबई, 5 मे : क्रेडिट कार्ड (Credit Card) कंपन्यांची मनमानी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कठोर पाऊल उचलले आहे. किंबहुना, क्रेडिट कार्ड जारी करताना, बँका ग्राहकांना त्याच्या फीचर्सबद्दल अतिशय मोहक पद्धतीने माहिती देतात, तर कार्डच्या पेमेंटवर व्याज आणि इतर शुल्क (Credit Card Charges) यांची माहिती दिली जात नाही. पण आता रिझव्र्ह बँकेने कार्डशी संबंधित प्रत्येक शुल्क पारदर्शक करण्यासाठी, ग्राहकांचे हित आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (RBI Guidelines), बँका ग्राहकांच्या संमतीशिवाय क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाहीत. तसेच, क्रेडिट कार्ड अपग्रेड केल्यास किंवा ग्राहकाला न विचारता खरेदी मर्यादा वाढवल्यास बँकेला दंड होऊ शकतो. क्रेडिट कार्डसह इतर ऑफर देऊ शकत नाहीत. सेंट्रल बँकेच्या नवीन क्रेडिट कार्ड नियमांनुसार, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी करण्यापूर्वी, बँका त्यांच्या ग्राहकांना कार्डवरील व्याजासह इतर सर्व प्रकारच्या शुल्कांची माहिती अनिवार्यपणे देतील. शेअर बाजारात कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज कशी असेल चाल? कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतील दुप्पट दंड भरावा लागेल क्रेडिट कार्डच्या थकबाकीच्या भरणाबाबत ग्राहकांना ईमेल किंवा एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. तसेच, पैसे भरण्यासाठी किमान 15 दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यानंतरच त्यांना दंड होऊ शकतो. या नियमाचे पालन न केल्यास, क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्याला बिलाच्या दुप्पट दंड भरावा लागेल. LIC IPO साठी खास मोठा निर्णय; ‘या’ दिवशीही गुंतवणूकदारांना लावता येणार बोली ग्राहकाला धमकावू शकत नाही मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता ग्राहकांना थकित बिल भरण्यासाठी धमकावता येणार नाही. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्याने कोणत्याही ग्राहकाला धमकावल्यास त्याची तक्रार मध्यवर्ती बँकेच्या लोकपालाकडे केली जाऊ शकते. एवढेच नाही तर नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका ग्राहकांना सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कॉल करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वानुसार, ग्राहकाची माहिती इतर कोणत्याही पक्षाशी शेअर करण्यासही मनाई आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.