Rule Change in July: जून महिना संपत असून जुलैपासून नवीन महिना सुरू होतोय. अशा वेळी दरवेळेप्रमाणेच या वेळीही अनेक मोठे बदल होणार आहेत. स्वयंपाकाचा गॅस, कमर्शिअल गॅस, सीएनजी-पीएनजीसह अनेक वस्तूंच्या किमती आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांच्या आपल्या खिशावर आणि मंथली बजेटवर थेट परिणाम होईल. अशा वेळी या बदलांची माहिती तुम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया जुलैपासून कोणकोणते बदल होणार आहेत. गॅसच्या किंमती देशातील सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी गॅसची किंमत ठरवतात किंवा त्यात सुधारणा करतात. यावेळीही एलपीजी गॅसच्या किमतीत 1 तारखेला बदल अपेक्षित आहे. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती, मात्र 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. याच कारणामुळे यावेळी एलपीजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. HDFC च्या मर्जरनंतर होम लोन आणि FD च्या गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार? सोप्या भाषेत घ्या समजून TCS शी संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतो तुम्ही परदेशी सुट्टीसाठी जात असाल तर तुमचे बजेट थोडे वाढवा. खरेतर, परदेशात होणाऱ्या खर्चासाठी कलेक्टेड टॅक्स अॅट सोर्स (TCS) शुल्क आकारण्याची नवीन तरतूद 1 जुलै 2023 पासून लागू केली जाऊ शकते. जर ही रक्कम 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर लोकांना 20 टक्के TCS फी भरावी लागेल. Life Insurance Loan: लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवरही घेऊ शकता लोन, जाणून घ्या काय आहेत नियम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलियम कंपन्या पहिल्या तारखेला गॅसच्या किमतीत बदल करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.