नवी दिल्ली, 24 जून : सध्याच्या काळात खूप कमी लोक असे असतील जे वेतनातील पैसे वाचवून घर खरेदी करत असतील. उद्योगपती किंवा ज्यांच्याकडे पूर्वजांचा पैसा आहे तेच फक्त कोणाचीही मदत न घेता घर खरेदी करु शकतात. मात्र सामान्य नोकरी करणाऱ्यांना लोन न घेता घर खरेदी करणं आता खूप कठीणं झालंय. होम लोन घेणं आता अनिवार्य झालं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोन घेणं चुकीचं मानलं जात होतं. कारण भारतीय समाजात कर्ज घेणं नेहमीच वाईट मानलं जातं. मात्र आता गोष्टी बदलत आहेत आणि लोक लोन घेऊन घर खरेदी करत आहेत.
घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. बँकेकडून थोडेफार पैसे घेतले तरी चालेल, पण घरासाठी कर्ज घेणे अनेक अर्थाने चांगले ठरू शकते. लोकांना त्याच्या टॅक्स बेनिफिटची माहिती आहे, परंतु याशिवाय, होम लोनचे काही फायदे आहेत. ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला होम लोनच्या अशाच काही फायद्यांबद्दल सांगणार आहोत. Bank Loan: लोन अप्लाय करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, बँक घरी बोलवून देईल कर्ज टॅक्स बचत बहुतेक लोकांना याबद्दल माहिती आहे. हे होम लोनचे सर्वात मोठे सेलिंग फिचर आहे. तुम्हाला मूळ रकमेवर 1.50 लाख रुपयांपर्यंत आणि त्यावर भरल्या जाणार्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळते. मात्र, पूर्ण झालेल्या घरावरच ही सूट मिळू शकते. तुम्हाला कंस्ट्रक्शन फ्लॅट किंवा घरावर कर सूट मिळणार नाही. प्रीपेमेंटवर कोणतंही शुल्क नाही तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले आणि वेळेपूर्वी त्याची पूर्ण परतफेड करण्याचा प्रयत्न केला तर बँक तुमच्याकडून प्रीपेमेंट चार्ज घेईल. होम लोन या बाबतीत वेगळे आहे. तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जशिवाय होम लोन प्रीपे करू शकता. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात तेव्हा तुम्ही बँकेत जा आणि दर महिन्याला EMI व्यतिरिक्त पैसे जमा करा. यामुळे तुमचे कर्ज लवकर संपेल आणि तुम्हाला कोणताही दंड आकारला जाणार नाही. Joint Home Loan: पत्नीसोबत जॉइंट होम लोन घ्यावं की नाही? पाहा काय सांगतात एक्सपर्ट प्रॉपर्टीची वैधता हा मुद्दा फार कमी लोकांना माहीत आहे. रिअल इस्टेट तज्ञांच्या मते, हा होम लोनचा एक मोठा फायदा आहे ज्याकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे. कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी मालमत्तेची सर्व कागदपत्रे तपासून घेते. ती मालमत्ता कायदेशीर आहे का, त्याचे टायटल ट्रान्सफर योग्य आहे का? त्यावर कोणताही वाद तर नाही ना. यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाते. अशा प्रकारे, हे सुनिश्चित केले जाते की, तुमची भविष्यातील मालमत्ता कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर गुंतागुंतीत नाही. म्हणूनच थोडं का होईना, बँकेकडून होम लोन घेणं योग्य आहे. पैसे परत करण्याचा कालावधी किती? इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत, होम लोन तुम्हाला पैसे परत करण्यासाठी जास्त वेळ देते. होम लोनच्या रिपेमेंटसाठी तुम्हाला 30 वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. दीर्घ कालावधी म्हणजे तुमच्यावरील जड EMI चे ओझे कमी होते.