जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Joint Home Loan: पत्नीसोबत जॉइंट होम लोन घ्यावं की नाही? पाहा काय सांगतात एक्सपर्ट

Joint Home Loan: पत्नीसोबत जॉइंट होम लोन घ्यावं की नाही? पाहा काय सांगतात एक्सपर्ट

जॉइंट होम लोन

जॉइंट होम लोन

Joint Home Loan: जर तुमची पत्नी नोकरी करत असेल तर तुम्ही जॉइंट होन लोनच्या मदतीने तुमचे स्वप्नातील घर खरेदी करावे की नाही? जाणून घ्या फायनेंशियल प्लानर काय सल्ला देतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Joint Home Loan: आपल्या स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. हे घर खरेदी करणे ही प्रत्येकासाठी आयुष्यभराची गुंतवणूक असते. हा मोठा आर्थिक निर्णय मानला जातो. बहुतेक लोक होम लोनच्या मदतीने स्वप्नातील घर खरेदी करतात. घर खरेदी करताना साइज आणि लोकेशन खूप महत्त्वाचे असते. घराची किंमतही यावर अवलंबून असते. सहसा 80-90 टक्केपर्यंत फायनेंसिंग होते. हे कर्ज 2-3 दशके चालणारं असतं. अशा स्थितीत व्याजदर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अशा वेळी जॉइंट होम लोन हा बेस्ट ऑप्शन आहे.

News18लोकमत
News18लोकमत

संयुक्त गृहकर्जाचे प्रमुख फायदे एक्सपर्ट सांगतात की, जॉइंट होम लोनच्या मदतीने घर घेतल्याचे अनेक फायदे होतात. तुम्ही तुमच्या पत्नीला को-अॅप्लीकेट किंवा को-ओनर बनवले तर बरेच फायदे आहेत. विशेषतः बायको नोकरी करत असेल तर हा फायदा अनेक प्रकारे वाढतो. पहिला फायदा तुमची पत्नी नोकरी करत असेल आणि तुम्ही तिला को-अॅप्लीकेंट बनवून होम लोन घेतले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सर्वात आधी, कर्ज मिळण्याची एलिजिबिलिटी वाढते. कारण यामध्ये इन्कम बेस वाढतो. जर दोन्हीचे CIBIL मजबूत असेल तर बँकेचा व्याजदर खूपच कमी असेल. Home Loan : आता 40 वर्षांसाठी मिळेल होम लोन, भाड्यापेक्षा कमी असेल EMI! दुसरा फायदा फायनेंसिंग इंस्टिस्टूशन महिलांना कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन ऑफर करतात. यासोबतच हायर आणि स्टेबल इन्कमच्या अॅप्लीकेंटलाही कमी इंटरेस्ट रेट ऑफर केला जातो. महिला को-अॅप्लीकेंटला अशा प्रकरणांमध्ये व्याजदरावर डबल फायदा मिळतो. तिसरा फायदा लोन प्रपोजलमध्ये को अॅप्लीकेंटचा उल्लेख असल्यास लेंडर्स सहजपणे कर्ज देतात. वास्तविक, यामध्ये रिस्क रिवॉर्ड कमी होते. एकट्या अर्जदाराच्या बाबतीत, बँकेची व्हेरिफिकेशन आणि प्रोसेसिंग टाइम थोडा जास्त वेळ घेतो. Top Up Loan: टॉप अप होम लोन म्हणजे काय? किती दिवसांसाठी मिळतं? एका क्लिकवर घ्या जाणून चौथा फायदा तुमची पत्नी को-अॅप्लीकेंटसोबतच को-ओनर ही असेल, तर टॅक्स बेनिफिटही डबल मिळतं. होम लोनच्या प्रीपेमेंटवर, कलम 24 अंतर्गत इंटरेस्ट पार्टवर सेक्शन 24 अंतर्गत 2 लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिट उपलब्ध आहे. प्रिंसिपल अमाउंट रीपेमेंट कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिट उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण नफा 3.5 लाख रुपयांपर्यंत असू शकतो. जर पत्नी को-ओनरल असेल तर दोघांनाही हा लाभ मिळेल आणि नेट टॅक्स लाभ 7 लाख रुपये असेल. पाचवा फायदा को-ओनरशीपचा फायदा घेण्यासाठी पत्नीला EMI देखील भरावा लागेल. जर पत्नी 50% मालमत्तेची मालकिन असेल तर तिला देखील EMI पैकी अर्धा भरावा लागेल. होम लोन मिळाल्यानंतर समजा काही वर्षांनी पत्नीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, तर बँकेला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. अशा परिस्थितीत होम लोन फेडण्याची क्षमता कमी होते. माहिती मिळाल्यावर बँकेच्या बाजूने करेक्टिव कारवाई केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात