जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM मधून पैसे काढा कार्ड किंवा मोबाइलशिवाय! फिंगरप्रिंट असं करेल काम

ATM मधून पैसे काढा कार्ड किंवा मोबाइलशिवाय! फिंगरप्रिंट असं करेल काम

ATM मधून पैसे काढा कार्ड किंवा मोबाइलशिवाय! फिंगरप्रिंट असं करेल काम

डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये आधार बेस्ड ऑथेंटिकेशन (Aadhaar-based Authentication) सुविधा उपलब्ध आहे. या सेवेच्या साहाय्याने एटीएम कार्डशिवाय बँकेचा कोणताही ग्राहक पैसे काढू शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : भारतात अनेक बँका एटीएम/डेबिट कार्ड (ATM/Debit Card) शिवाय एटीएम मशिनमधून पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. याकरता मोबाइल क्रमांक आणि पिनची आवश्यकता असते. मात्र जर एटीएम कार्ड आणि मोबाइलशिवाय एटीएम मशिनमधून पैसे काढचा आले तर? डीबीसी बँकेने 2016 मध्ये अशाप्रकारची सुविधा मुंबईत सुरू केली आहे. देशातील पहिले आधार बेस्ड एटीएम डीसीबी बँकेचे आहे. या प्रणालीअंतर्गत खातेधारकाची ओळख त्याच्या बोटाचे ठसे, रेटिना स्कॅन या माध्यमातून केली जाते. सध्या डीसीबी बँक त्यांच्या एटीएम मशिनमध्ये फिंगरप्रिंट ऑथंटिकेशनची सुविधा देत आहे. डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये आहे आधार बेस्ड ऑथेंटिकेशनटी सुविधा सध्याच्या काळात तंत्रज्ञानामध्ये खूप वेगाने बदल होत आहेत. एटीएमच्या बाबतीतही ते दिसून येत आहे. भारतात खाजगी क्षेत्रातील बँक असणाऱ्या डेव्हलपमेंट क्रेडिट बँक (DCB Bank) या बँकेत एटीएमची ही सुविधा उपलब्ध आहे.  डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये आधार बेस्ड ऑथेंटिकेशन (Aadhaar-based Authentication) सुविधा उपलब्ध आहे. या सेवेच्या साहाय्याने एटीएम कार्डशिवाय बँकेचा कोणताही ग्राहक पैसे काढू शकतो. (हे वाचा- दावा: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार 100 रुपये, हे आहे सत्य) बोटांच्या ठशांवरून होणार खातेधारकाची ओळख या सुविधेसाठी ग्राहकांचे खाते आधार क्रमांकाशी लिंक्ड असणे गरजेचे आहे. सध्या अधिकतर खाती आधारशी लिंक्ड असतातच. डीसीबी बँकेच्या ग्राहकांना एटीएम  मशिनमध्ये जाताना कार्ड नेण्याची आवश्यकता नाही. केवळ फिंगरप्रिंटमुळे खातेधारकांची ओळख होऊ शकते. काय आहे बायोमेट्रिक सिस्टिम? बायोमेट्रिक सिस्टिम ओळख दाखल करण्याची एक पद्धत आहे. या प्रणालीअंतर्गत खातेधारकाची ओळख त्याच्या बोटांचे  ठसे, रेटिना स्कॅन इत्यादीच्या माध्यमातून होते. सध्या डीसीबी बँक त्यांच्या एटीएम मशिनमध्ये फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनची सुविधा देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात