मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलं 5G तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलं 5G तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेक

PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोंबरला देशात 5G होणार लाँच, ‘या’ शहरांना सर्वप्रथम मिळणार सेवा

PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोंबरला देशात 5G होणार लाँच, ‘या’ शहरांना सर्वप्रथम मिळणार सेवा

आता तुमच्या फोनमध्ये 5G चालणार की नाही हे तुम्ही कसं तपासू शकता ते जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली : डिजिटल युगात आता भारत अधिक वेगानं पुढे जाऊ शकणार आहेत आता 3G किंवा 4G चा जमाना गेला आता 5G चा जमाना आला आहे असं म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. १३ शहरांमध्ये पहिल्यांदा 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

इंटरनेट स्पीडवर मोठा फरक पडणार आहे. एक मोठा फरक एक मोठी क्रांती भारतात होत आहे. याचा मोठा फायदा कम्युनिकेशन स्पीड सुधारण्यासाठी होणार आहे. आता तुमच्या फोनमध्ये 5G चालणार की नाही हे तुम्ही कसं तपासू शकता ते जाणून घेऊया.

5G सपोर्ट अशा प्रकारे तपासला जाऊ शकतो?

- तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावं लागेल.

- तिथे अनेक पर्याय असतील, त्यापैकी तुम्हाला Connection किंवा Wi-Fi & Network वर क्लिक करावं लागेल.

- आता यूजर्सला Sim and Network या पर्यायावर जावं लागेल. काही स्मार्टफोनमध्ये हा पर्याय Mobile Networkच्या पर्यायात उपलब्ध असेल.

5G Launch : सर्वात मोठा क्षण! देशात 5G सेवेला आजपासून सुरुवात

- येथे तुम्हाला Network Mode पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला Preferred Network Type वर जावं लागेल. तुम्हाला येथे 5G नेटवर्कचा पर्याय दिसतो का?

- जर उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुमचा फोन 5G नेटवर्कसाठी तयार आहे. आपण इच्छित असल्यास आपण थेट पसंतीचे नेटवर्क प्रकार शोधून ही सेटिंग तपासू शकता.

- तुम्ही इतर मार्गांनीदेखील 5G नेटवर्क सपोर्ट तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. येथे यूजर्सला त्यांच्या स्मार्टफोनचे मॉडेल शोधावं लागेल.

- 5G बँडच्या तपशीलांमध्ये त्याची स्पेसिफिकेशन तपासावी लागतील. भारतात सेवा देणाऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्स सर्व्हिस प्रोव्हायडरचे निश्चित बँड तुमच्या फोनमध्ये असतील, तर नक्कीच तुमच्या फोनला 5G सपोर्ट मिळेल.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 5G नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक खूप मोठा फायदा मिळवून देऊ शकते. परिवर्तन घडवून आणू शकते. स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवनिर्मितीला चालना देण्यासाठी तसेच 'डिजिटल इंडिया'ची दृष्टी पुढे नेण्यास मदत करेल. भारतावर 5G चा आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

First published:

Tags: 5G, Airtel, Delhi, PM narendra modi, Reliance Jio