Home /News /money /

महागाई कंबरडं मोडणार; आता कपडे खरेदी करणेही महाग होणार, काय आहे कारण?

महागाई कंबरडं मोडणार; आता कपडे खरेदी करणेही महाग होणार, काय आहे कारण?

सध्या टेक्सटाईलवर 5 टक्के जीएसटी (Goods and services tax) आकारला जातो, तर सरकारला तो 12 टक्के करायचा असल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई, 4 जून : महागाईला सर्वसामन्या जनतेची दिवसेंदिवस चिंता वाढवत आहे. सर्व वस्तूंचे दर वाढल्याने अनेकांच्या घराचं बजेट बिघडलं आहे. भाजीपाला, धान्य, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. पेट्रोल डिझेलचे दरही सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करत आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा वस्त्रोद्योग (Textile Industry) 12 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येऊ शकते. त्यामुळे वस्त्रोद्योगावरील जीएसटी वाढल्यास कपडे खरेदी करणे पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. न्यूज नेशन टीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. सध्या टेक्सटाईलवर 5 टक्के जीएसटी (Goods and services tax) आकारला जातो, तर सरकारला तो 12 टक्के करायचा असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी देखील कापड उद्योगावर 12 टक्के जीएसटी जाहीर करण्यात आला होता जो या वर्षाच्या सुरुवातीला लागू होणार होता. परंतु तीव्र विरोधानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला. मात्र पुन्हा एकदा नव्याने याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 6 कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका, पीएफ व्याजदरात कपात जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत याबाबत निर्णय जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत वस्त्रोद्योगासाठी जीएसटीबाबत निर्णय घेतला जाईल. याशिवाय ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो रेस कोर्सेसवर 28 टक्के जीएसटी लावला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते. Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोवर सर्वोच्च दर GST कौन्सिल सध्या कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाच्या (GoM) अहवालाची वाट पाहत आहे. GoM चे मंत्री देखील ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोवर 28% GST चे सर्वोच्च दर लागू करण्याच्या बाजूने आहेत. मंत्र्यांच्या गटाला जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) दरासाठी 6 महिन्यांची मुदत दिली जाऊ शकते, असे मानले जाते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: GST, Inflation, Modi government

    पुढील बातम्या