मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जवळपास 6 कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका, पीएफ व्याजदरात कपात

जवळपास 6 कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका, पीएफ व्याजदरात कपात

लवकरच लाभधारकांच्या खात्यात पीएफची रक्कम येणार आहे. ही रक्कम सुधारित व्याजदरांनुसार जमा होईल. नवीन व्याजदर हा 1977-78 नंतरचा सर्वांत कमी दर आहे.

लवकरच लाभधारकांच्या खात्यात पीएफची रक्कम येणार आहे. ही रक्कम सुधारित व्याजदरांनुसार जमा होईल. नवीन व्याजदर हा 1977-78 नंतरचा सर्वांत कमी दर आहे.

लवकरच लाभधारकांच्या खात्यात पीएफची रक्कम येणार आहे. ही रक्कम सुधारित व्याजदरांनुसार जमा होईल. नवीन व्याजदर हा 1977-78 नंतरचा सर्वांत कमी दर आहे.

मुंबई, 4 जून: कुठल्याही सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ (Provident Fund) किती महत्त्वाचा असतो, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. देशातील सुमारे सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. मार्चमध्ये, ईपीएफओने (EPFO) पीएफ व्याजदर (PF Interest Rate) 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. म्हणजेच पीएफच्या व्याजदरात 0.04 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आता मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वांत कमी व्याजदर आहे. जनसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

विशेष म्हणजे मार्चमध्ये निर्णय घेतल्यानंतर कामगार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे संमतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. व्याजदराच्या प्रस्तावावर सरकारच्या संमतीनंतर, ईपीएफओ आता चालू आर्थिक वर्षासाठीचा निश्चित व्याजदर ईपीएफ खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात करेल. म्हणजेच लवकरच लाभधारकांच्या खात्यात पीएफची रक्कम येणार आहे. ही रक्कम सुधारित व्याजदरांनुसार जमा होईल. नवीन व्याजदर हा 1977-78 नंतरचा सर्वांत कमी दर आहे. त्यावेळी पीएफसाठी 8 टक्के व्याजदर देण्यात आला होता.

Real Estate Investment: प्रॉपर्टी खरेदी न करताही कमावा नियमित भाडे, कसं?

ईपीएफओ कार्यालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफ (EPF) योजनेतील सर्व सदस्यांच्या खात्यामध्ये 2021-22 या वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदराने व्याज जमा करण्यास केंद्र सरकारच्या मंजुरीची माहिती दिली आहे. याचा अर्थ आता ईपीएफओ सदस्यांना 8.5 टक्के व्याजदर दिला जाणार नाही. त्याऐवजी ठेवींवर 8.1 टक्के व्याज दिले जाईल.

मार्च 2021 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने (CBT) 2020-21 या वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर 8.5 टक्के व्याज दर निश्चित केला होता आणि ऑक्टोबर 2021 मध्ये वित्त मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली होता. हा व्याजदर गेल्या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला गेला होता. यापूर्वी 2018-19 मध्ये 8.65 टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते.

Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा

ईपीएफओने 2016-17 मध्ये ठेवींवरील व्याजदर 8.65 टक्के केला होता. तर 2017-18 मध्ये हा दर 8.55 टक्के होता. सरकारने 2015-16 मध्ये सर्वाधिक 8.8 टक्के व्याजदर दिला होता. 2013-14 आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के दराने व्याज दिलं गेलं होतं. 2012-13 मध्ये पीएफचे व्याजदर 8.5 टक्के आणि 2011-12 मध्ये 8.25 टक्के होते. सरकारने पीएफ व्याजदरामध्ये कपात केली आहे. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published:

Tags: Epfo news, Investment, Money, Pf news