मुंबई, 4 मे : गुंतवणुकीसाठी एफडी (Fixed Deposit) हा सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो. बँकेत पैसे सुरक्षित राहतात आणि परतावा देखील कमी पण निश्चित असतो. मात्र FD मध्ये गुंतवणूक (Investment Tips) करण्याचे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत त्याची माहिती देखील गुंतवणूकदारांना असणे गरजेचं आहे. सध्या सर्व खाजगी आणि सरकारी बँका त्यांच्या एफडीवरील व्याजदर (FD Interest Rates) वाढवत आहेत, जेणेकरून ते गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक वाटेल. ही वाढ असूनही, इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत एफडीवरील परतावा खूपच कमी असल्याचे दिसून येते. म्हणजेच कमी परतावा मिळणे हा एफडीमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा तोटा आहे. त्याऐवजी, तुम्ही कॉर्पोरेट एफडी, बाँड किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. लिक्विडिटी समस्या FD ची दुसरी कमतरता म्हणजे त्याची लिक्विडिटी. म्हणजे गरजेच्या वेळी पैसे परत पटकन मिळत नाहीत. एकदा तुम्ही बँकेत एफडी केली की, त्याची मॅच्युरिटी वेळही निश्चित होते. आवश्यक असल्यास त्या निर्धारित वेळेपूर्वी तुम्ही तुमचे पैसे काढू शकत नाही आणि तुम्ही तसे केल्यास तुमच्याकडून परताव्याच्या तुलनेत जास्त शुल्क आकारले जाईल. महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता; RBI ‘हे’ पाऊल उचल्यास तुमच्यावर काय परिणाम होणार? काही बँका तुमच्याकडून FD मधून लवकर पैसे काढण्यासाठी 1 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारू शकतात. अशा परिस्थितीत, तुमच्या ठेवीची रक्कम जितकी जास्त असेल तितकेच त्यावर शुल्क आकारले जाईल. त्यामुळे तुम्ही अनेक एफडी छोट्या रकमेच्या स्वरूपात कराव्यात, जेणेकरून गरज पडल्यास कमी रकमेचीच एफडी मोडता येईल. कर लाभ देखील मर्यादित गुंतवणूकदारांसाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की सर्व प्रकारच्या एफडी कर लाभ (FD Tax Benefits) देत नाहीत. 5 वर्षांच्या कार्यकाळाच्या काही FD वर, तुम्हाला कराचा लाभ दिला जातो, परंतु जर तुम्हाला यावर मर्यादेपेक्षा जास्त रक्कम मिळाली तर तुम्हाला काही रक्कम TDS म्हणून भरावी लागेल. याउलट, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही बाँड किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (National Saving Certificate) इत्यादींमध्ये पैसे गुंतवून कराचा लाभ घेऊ शकता. पत्नीच्या नावाने उघडा NPS अकाउंट; 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर पेन्शन एफडीचे फायदे एफडी करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमचे पैसे निश्चित वेळेसाठी सुरक्षित होतात, ज्यावर बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम होत नाही आणि निश्चित परतावा मिळतो. एफडी करताना, तुम्हाला कार्यकाळ निवडण्यासाठी बरेच पर्याय मिळतात. यासाठी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कार्यकाळाचा पर्याय उपलब्ध आहे. गरजेच्या वेळी FD मोडणे हा एकमेव पर्याय नाही. तुम्ही तुमच्या FD च्या रकमेच्या 90% पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.