• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold price today: दोन महिन्याच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या किंमती, पाहा आजचा सोन्याचा भाव

Gold price today: दोन महिन्याच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या किंमती, पाहा आजचा सोन्याचा भाव

भारतात सोन्याचा दर मागील वर्षाच्या सर्वोच्च स्तरावरुन 10000 रुपयांनी कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव एक आठवड्याच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून: आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दरात (Gold Price today) घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोनं स्वस्त झालं आहे. सोमवारी MCX अर्थात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव 0.1 टक्क्यांच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या निच्चांकी 46,970 प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 0.26 टक्क्यांनी वधारला असून 68,049 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. भारतात सोन्याचा दर मागील वर्षाच्या सर्वोच्च स्तरावरुन 10000 रुपयांनी कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव एक आठवड्याच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. 28 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव - राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट गोल्ड रेट 50320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याशिवाय चेन्नईत 48510 रुपये, मुंबईत 47170 रुपये, कोलकातामध्ये 49230 रुपये, बंगळुरूमध्ये 48120 रुपये, हैदराबादमध्ये 48120 रुपये, जयपुरमध्ये 50320 रुपये, लखनऊमध्ये 50320 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोनं खरेदीबाबत काय आहे जाणकारांचं म्हणणं - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस सोन्याचा दर मागील वर्षाचा रेकॉर्ड मोडत 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो असा अंदाज आहे. परंतु या मधल्या काळात अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अशात गुंतवणुकदार 6 महिन्यांच्या काळात आणि स्टॉपलॉससह नफा कमावू शकतात.

  (वाचा - कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड)

  सोन्यातील गुंतवणुकीबाबत बोलताना जाणकारांनी सांगितलं, की मागील वर्षापासून सोन्याने 28 टक्के रिटर्न दिले आहेत. त्या आधीच्या वर्षातही सोन्याचे रिटर्न जवळपास 25 टक्के होते. जर दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर सोनं गुंतवणुकीसाठी अतिशय चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता (Purity) तपासू शकतात. या App द्वारे केवळ सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारदेखील दाखल करता येईल. जर लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यासही ग्राहक याची तक्रार करू शकतील.
  Published by:Karishma
  First published: