जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Silver Rate Today: सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण दिसून येत आहे. सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 512 रुपयांनी घसरून 60,613 रुपये प्रति किलोवर आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जून : लग्नसराईनचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) चढ उतार दिसून येत आहे. आज सोने आणि चांदीमध्ये काहीशी घसरण दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात वाढलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा 50 हजारांच्या जवळ येताना दिसत आहे. चांदीची किंमतही 61 हजारांच्या खाली येताना दिसत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सकाळी सोन्याचा भाव (Gold Price Today) 375 रुपयांनी घसरून 50,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सकाळी 50,654 रुपयांच्या दराने ट्रेडिंग सुरू झाले, परंतु गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे तो लवकरच 0.74 टक्क्यांनी घसरला. यापूर्वी सोन्याचा वायदा भाव 51 हजारांच्या आसपास चालत होता. चांदीच्या दरातही घसरण सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण दिसून येत आहे. सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 512 रुपयांनी घसरून 60,613 रुपये प्रति किलोवर आला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 60,752 रुपयांवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु कमी मागणीमुळे त्याच्या किमती 0.84 टक्क्यांनी घसरल्या आहेत. गेल्या काही सत्रांमध्ये चांदीचा भाव 62 हजारांच्या वर पोहोचला होता. New Rule: आजपासून बदलणारे ‘हे’ 10 नियम तपासा, थेट तुमच्या खर्चावर होणार परिणाम कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. रेल्वेने प्रवास करताना जास्तीचं सामान घेण्याआधी नियम समजून घ्या; अन्यथा दंड भरावा लागेल मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात